Home /News /crime /

खो-खो खेळाडूची निर्घृण हत्या; अखेरपर्यंत केला संघर्ष, मात्र नराधमांनी साधला डाव

खो-खो खेळाडूची निर्घृण हत्या; अखेरपर्यंत केला संघर्ष, मात्र नराधमांनी साधला डाव

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एका राष्ट्रीय पातळीवरच्या (National Level player) महिला खो-खो खेळाडूची हत्या (Murder) झाल्याची घटना उघडकीला आली आहे.

    लखनऊ, 12 सप्टेंबर : एका राष्ट्रीय पातळीवरच्या (National Level player) महिला खो-खो खेळाडूची हत्या (Murder) झाल्याची घटना उघडकीला आली आहे. भर रस्त्यावर तिचा मृतदेह (Dead body) पडल्याचं आढळल्यानंतर एकच खळबळ सुरू झाली. तिची हत्या नेमकी कुणी केली, कुठे केली आणि कशासाठी केली याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. मात्र एका राष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडूनं तिच्यावर जीवघेणे हल्ले होत असतानाही हार मानली नसल्याचं मृतदेहाच्या अवस्थेवरून दिसून येत असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं आहे. अखेरपर्यंत केला प्रतिकार उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये 24 वर्षांची राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू राहत होती. तिच्यावर काही नराधमांनी हल्ला केला आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ती राहत असलेल्या कॉलनीपासून काही किलोमीटर अंतरावर तिचा मृतदेह पडल्याचं तिच्या बहिणीला दिसलं. त्यानंतर तिने कुटुंबीयांना याची कल्पना दिली. मृतदेहावर अनेक जखमा असून तरुणीचा दातदेखील झटापटीत पडल्याचं स्पष्ट दिसत आहे. तिच्या नाकातून रक्त वाहत होतं, तर तोंडावर हल्ला झाल्यामुळे तिचा एक दातही पडला होता. एका राष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडूनला कुणा एका व्यक्तीनं अशा प्रकारे मारणं शक्य नसल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तीन ते चार व्यक्तींनी तिच्याच ओढणीनं गळा आवळून तिची हत्या केली. मात्र जीव असेपर्यंत तिने त्या सर्वांशी संघर्ष केल्याच्या खुणा तिच्या मृतदेहावर दिसून येत होत्या. हे वाचा - बाप्पा पावला! 8 जिल्ह्यांत एकही कोरोना रुग्ण नाही; राज्याचा आकडाही दिलासादायक पोलीस तपास सुरू पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात  आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र भर रस्त्यावर एका राष्ट्रीय खेळाडूला मारूना टाकलं, तरी पोलिसांना कसं समजलं नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी कुटुंबीयांनी कायदा आणि सुव्यस्थेबाबत नाराजी व्यक्त केली असून खुन्यांना शोधून  फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Murder, Uttar pradesh

    पुढील बातम्या