Home /News /crime /

जावई की कसाई; सासऱ्याची आणि मेव्हण्याची केली हत्या; पत्नीचं अपहरण करुन आरोपी पसार

जावई की कसाई; सासऱ्याची आणि मेव्हण्याची केली हत्या; पत्नीचं अपहरण करुन आरोपी पसार

काही दिवसांपूर्वीच त्यांनी घटस्फोट घेतला होता

    अमरावती, 15 फेब्रुवारी : आपल्या आजोबाकडे राहत असलेल्या व घटस्फोट घेतल्यानंतरही पत्नीला जबरीने आणावयास गेलेल्या जावयाने पत्नीच्या वडिलांसह भावावर चाकूने वार करुन त्यांची हत्या केली. पत्नीच्या आजोबाच्या गुप्तांगावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले आहे. सदर घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील कुरळ पुर्णा येथे काल घडली. मुलीच्या तक्रारीवरुन चांदूरबाजार पोलिसांनी आरोपी रवी सुरेश पर्वतकर राहणार अमरावती यांचे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रवी दोघांची हत्या करुन मुलीला गाडीवर बसवून पसार झाला. मात्र आरोपी रवी परवतकर याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून पत्नी हर्षा हिची सुटका करण्यात आली आहे. हे ही वाचा-धक्कादायक! स्मरणशक्ती वाढवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना देत होता इंजेक्शन मुलीची आई कुरळपूर्णा येथील रहिवासी मीरा बंडू साबळे वय 40 वर्ष यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी रवी पर्वतकर व मुलगी हर्षा यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांनतर त्यांचे आपसात पटत नसल्याने एकमेकांच्या सहमतीने 27 नोव्हेंबर 2020 रोजी घटस्फोट झाला होता. तेव्हा पासून मुलगी हर्षा माहेरी अमरावतीलाच राहत होती. मात्र आरोपीने घर गाठून सर्वांनाच मारहाण केली. आमच्या मुलीला तू मारहाण करतोस, म्हणून तू तिला घेऊन जाऊ नकोस, असे हर्षाच्या आई, वडिलाने रवीला बजावले. यावर हर्षा माझी पत्नी आहे, मी घेऊन जाईन, तुम्ही अडवणारे कोण? अशा प्रकारे आरोपीने त्यांना धमकावले होते. यानंतर आरोपीने पत्नीचे वडील व भावाची धारदार शस्त्राने हत्या केली. शिवाय महिलेचे आजोबा विश्वनाथ साबळे यांच्या गुप्तांगावर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. व गाडीवर बसवून हर्षाचे अपहरण करुन आरोपी जावयी रवि पसार झाला होता. मात्र आरोपी रवी परवतकर याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून पत्नी हर्षा हिची सुटका करण्यात आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder

    पुढील बातम्या