गुमला (झारखंड), 23 एप्रिल : अंधश्रद्धेतून जादूटोणा केल्याचा आरोप करून निष्पाप लोकांच्या हत्यांचे प्रकार जिल्ह्यात सर्रास सुरू आहेत. आणखी एक धक्कादायक घटना गुमला जिल्ह्यातील चैनपूर प्रखंडच्या बुकमा गावातून समोर आली आहे. एका महिलेने आपल्या मोठा दीर आणि वहिनीची हत्या केली आहे. (Murder in Gumla) हत्येची घटना घडल्यानंतर आरोपी महिलेने चैनपूर पोलिस स्टेशन गाठले. तिने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले आणि आपला गुन्हा कबूल केला आहे. सुमित्रा देवी (50 वर्ष) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
प्रकरण काय?
आरोपी महिला सुमित्रा देवीने सांगितले की, तिची मुले अनेक दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे तिला आपल्या मोठा दीर लुंद्रा गाल बडाईक (वय 70 वर्षे) आणि वहिनी फुलमा देवी (65 वर्षे) यांनी आपल्या मुलाला आजारी केले असल्याचा संशय त्याला आला. यामुळे तिने काल रात्री दोघांची हत्या केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.