मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

काय चाललंय काय? 20 वर्षांच्या तरुणाची भर रस्त्यात चाकूने हत्या, शाळेच्या गणवेशात आले आरोपी

काय चाललंय काय? 20 वर्षांच्या तरुणाची भर रस्त्यात चाकूने हत्या, शाळेच्या गणवेशात आले आरोपी

शाळेच्या गणवेशात आलेल्या आरोपींनी भर रस्त्यात एका 20 वर्षांच्या (Murder of a youth in the road)  तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे.

  • Published by:  desk news

चंदिगढ, 12 ऑक्टोबर : शाळेच्या गणवेशात आलेल्या आरोपींनी भर रस्त्यात एका 20 वर्षांच्या (Murder of a youth in the road)  तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या आणि चारचौघात या (Murder in the daylight) आरोपींनी तरुणाचा बळी घेतला. हत्येची ही घटना सीसीटीव्हीत (Murder recorded in CCTV) कैद झाली असून त्यामुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घ्यायला सुुरुवात केली आहे.

अशी घडली घटना

हरियाणातील अंबाला जिल्ह्यात सोमवारी दिवसाढवळ्या एका 20 वर्षांच्या तरुणाची हत्या करण्यात आली. या भागात असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. किती निर्घृणपणे आरोपी चाकूने वार करत आहे, हे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. चाकूचे वार झाल्यानंतर हा तरुण मटकन जमिनीवर खाली बसत असल्याचंही या व्हिडिओत दिसतं. या घटनेनंतर तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं तपास सुरू केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने शाळेचे कपडे घातले होते. त्या कपड्यांच्या वर्णनावरून पोलीस वेगवेगळ्या आसपासच्या शाळांमध्ये चौकशी करत आहेत. हत्या झालेल्या तरुणाचं नाव उज्ज्वल असल्याची माहिती आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून घटनेचा तपास सुरु केला आहे.

खुनाचं कारण अस्पष्ट

या तरुणाचा खून नेमका कशासाठी झाला, याचं कुठलंही कारण पोलिसांना समजलेलं नाही. पोलिसांनी उज्ज्वलच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली असता, त्यांना या प्रकरणाची कुठलीही माहिती नसल्याचं दिसून आलं. उज्ज्वलची कुणासोबत भांडणं झाली होती का किंवा प्रेमप्रकरणातून ही हत्या झाली असावी का, अशा सर्व शक्यता गृहित धरून पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली आहेत. लवकरच खुनी आरोपीला अटक केलं जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

First published:

Tags: Crime, Haryana, Murder