Home /News /crime /

Breaking news: नागपूर हादरलं! भल्या पहाटे युवकाची दगडानं ठेचून हत्या; दोघं ताब्यात

Breaking news: नागपूर हादरलं! भल्या पहाटे युवकाची दगडानं ठेचून हत्या; दोघं ताब्यात

हरदासनगर जवळ एका युवकाची निर्घृण हत्या (Murder in Nagpur) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विवेक हुमने वय 37 वर्ष असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे.

    नागपूर 22 मार्च : नागपुरात गुन्हेगारीच्या (Crime) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा जिल्ह्याच्या जुनी कामठी येथून असंच एक प्रकरण समोर आलं आहे. हरदास नगर जवळ एका युवकाची निर्घृण हत्या (Murder in Nagpur) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विवेक हुमने वय 37 वर्ष असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्याच्या जुनी कामठी येथील हदरास नगर जवळ 37 वर्षीय विवेक हुमने या तरुणाची हत्या झाली. ही घटना सोमवारी पहाटे घडली आहे. युवकाची दगडानं ठेचून निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. मात्र, या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून खळबळ उडाली आहे. भल्या पहाटे झालेल्या या हत्येचं कारण नेमकं काय आहे, याचा तपास सध्या सुरू आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Death, Murder news, Nagpur, Shocking news

    पुढील बातम्या