• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • व्यवसाय करणाऱ्या तरुणाची भर चौकात गोळ्या घालून हत्या, नागरिकांमध्ये खळबळ

व्यवसाय करणाऱ्या तरुणाची भर चौकात गोळ्या घालून हत्या, नागरिकांमध्ये खळबळ

व्यवसाय करणाऱ्या युवकाचा गोळ्या घालून दिवसाढवळ्या खून करण्यात आला आहे.

  • Share this:
हैदर शेख,चंद्रपूर, 8 ऑगस्ट :चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात भरदिवसा चौकात झालेल्या एका हत्येने दहशतीचे वातावरण पसरले आहे. सुरज बहुरिया नामक कोळसा व्यवसाय करणाऱ्या युवकाचा गोळ्या घालून दिवसाढवळ्या खून करण्यात आला आहे. बल्लारपूर शहरातील जुना बस स्टँड भागात सुरज बहुरिया कारमध्ये बसून जाण्यासाठी निघत असताना काही युवक कार जवळ आले आणि त्यांनी अगदी जवळून गोळ्या झाडून सुरज बहुरिया यांना ठार मारले. चौकात झालेल्या या घटनेनंतर नागरिकांनी तातडीने बहुरिया याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. मात्र तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आले. बहुरिया यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समर्थकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घालून मृतदेह रुग्णवाहिकेत टाकत रुग्णवाहिका बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या समोर उभी केली आहे. यामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे. मात्र याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. हेही वाचा - पिंपरीतील धक्कादायक प्रकार! आजी-आजोबाने अल्पवयीन मुलीसमोरच केले अश्लील चाळे दरम्यान, घटनास्थळी तीन रिकामी काडतूसे तर तीन भरलेल्या गोळ्या आढळून आल्या. चंद्रपूर उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांना या हत्येनंतर सतर्क करण्यात आले असून बल्लारपूर शहरात बंदोबस्त वाढविण्यात येत आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलीस वेगवान तपास करत आहेत.
Published by:Akshay Shitole
First published: