मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या मुलाचा बापाने केला खून, झटापटीत चाकू खुपसला पोटात!

दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या मुलाचा बापाने केला खून, झटापटीत चाकू खुपसला पोटात!

सौरभने हातातील चाकू काढून वडिलांना धमकावत असताना झालेल्या झटापटीत वडिलांच्या हातातून चाकू सौरभच्या पोटात खुपसला गेला.

सौरभने हातातील चाकू काढून वडिलांना धमकावत असताना झालेल्या झटापटीत वडिलांच्या हातातून चाकू सौरभच्या पोटात खुपसला गेला.

सौरभने हातातील चाकू काढून वडिलांना धमकावत असताना झालेल्या झटापटीत वडिलांच्या हातातून चाकू सौरभच्या पोटात खुपसला गेला.

जळगाव, 14 फेब्रुवारी : जळगाव (Jalgaon) येथे पिता-पुत्राच्या नात्याला काळीमा फासणारी घटना शहरात घडली असून एका बापाने आपल्या पोटच्या मुलाचाच खून केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. मुलगा दारू पिऊन घरी आला असताना शाब्दिक वाद विकोपाला जाऊन झालेल्या झटापटीत रागाच्या भरात पित्याच्या हातून मुलाचा मृत्यू झाला.

सौरभ सुभाष वर्मा (वय 26)  हे दोन भाऊ, आई-वडिलांसह बालाजीपेठ इथं राहत होता. सौरभ वर्मा याला दारूचे व्यसन होते. दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होता. अशाच पद्धतीने शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास दारू पिऊन सौरभ घरी आला. दारू पिऊन घरी आल्यानंतर वडील संतोष बन्सीलाल वर्मा आणि सौरभ यांच्यात शाब्दिक वाद होऊन वाद विकोपाला गेला. सौरभने हातातील चाकू काढून वडिलांना धमकावत असताना झालेल्या झटापटीत वडिलांच्या हातातून चाकू सौरभच्या पोटात खुपसला गेला. त्यामुळे सौरंभ गंभीर जखमी झाला होता.

पंतप्रधानांनी सैन्याला सोपवले अर्जुन रणगाडे, वाचा शत्रूंना का भरणार धडकी!

तातडीने सौरभला जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी मयत घोषित केले. घटना घडल्यानंतर संशयित आरोपी सुभाष बन्सीलाल वर्मा हे शनिपेठ पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाले. वर्मा यांना ताब्यात घेतल्यानंतर कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा यांनी दिली आहे.

IND vs ENG : अश्विनच्या फिरकीपुढे इंग्लंडचं लोटागंण, भारताला मोठी आघाडी

'शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सौरभ वर्मा या  व्यक्तीचा खून झालेला आहे', सुरुवातीला हॉस्पिटलमधून फोन आला होता. त्यांना चाकू लागलेला असं आम्हाला कळलं. ही घटना त्यांच्या घरीच घडलेली असून तपास केलेला आहे. पूर्ण तपास केल्यानंतर रागाच्या भरात पित्याने आपल्या मुलाचा खून केल्याच्या स्पष्ट झाले असून या अंतर्गत कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: