अमेठी, 4 ऑक्टोबर : दुकानदाराने सिगरेट न दिल्याच्या किरकोळ कारणावरून (Murder of a shopkeeper as he refused to give cigarette) त्याचा निर्घृण खून झाल्याची घटना उघड झाली आहे. दारुच्या नशेत सिगरेट घेण्यासाठी पोहोचलेल्या आरोपींना दुकानदाराने सिगरेट (Criminals murdered shopkeeper) देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी दुकानदारावर खुनी हल्ला केला. दुकानदाराच्या डोक्यात दांडक्याने वार करून बेशुद्ध झालेल्या दुकानदाराचा (Hit to make unconscious and killed) त्यांनी खून केला. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.
असा घडला गुन्हा
उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या रामकुमार हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दारू प्यायल्यानंतर आरोपी संदीप आणि अमन सरोज हे सिगरेट घेण्यासाठी रामकुमारच्या दुकानात गेले होते. रामकुमारकडे त्यांनी एका सिगरेटची मागणी केली. मात्र रामकुमारने सिगरेट देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी आणि रामकुमार यांच्यात जोरदार वादावादीला सुरुवात झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी संदीपनं रामकुमार यांच्या डोक्यात दांडक्याने जोरदार प्रहार केला. त्यामुळे रामकुमार यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध होऊन खाली पडले.
त्यानंतरही आरोपींचा राग शांत झाला नाही. आरोपी संदीपने रामकुमार यांचा गळा दाबला आणि अमनने त्यांचे पाय पकडून ठेवले. यामुळे रामकुमार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह उचलून आरोपींनी तो पालथा ठेवला आणि तिथून पळ काढला. रामकुमार यांच्या मुलाने पोलिसांत गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत आरोपींचा शोध सुरू केला.
हे वाचा - नात्याला काळीमा! मित्राकडून 500 रुपये घेऊन दिली पत्नीवर बलात्काराची परवानगी
असा झाला उलगडा
पोलीस आरोपींचा शोध घेत असताना काहीजणांना दुसऱ्या एका प्रकरणात शस्त्रांस्त्रांसह अटक करण्यात आल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांच्याकडे केलेली चौकशी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपी संदीप आणि अमन यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर याच दोघांनी रामकुमार यांचा खून केल्याचं त्यांनी कबूल केलं. या दोघांकडून गावठी कट्टे, काडतुसं आणि इतर शस्त्रास्त्रं पोलिसांनी जप्त केली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Murder, Uttar pardesh