पालघर, 15 जानेवारी : पालघर जिल्ह्यातील वानगाव येथे प्रियकराने प्रेयसीला गळा दाबून ठार मारले आणि नंतर फ्लॅटमधील भितीत गाडून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. उमरोली येथील हे प्रेमीयुगुल पळून जाऊन लग्न करण्यासाठी वानगाव येथील वृंदावन दर्शनमध्ये राहायला आले होते. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिता मोहिते असं मृत तरुणीचे नाव आहे. तर सुरज घरत असं आरोपी तरुणाचे नाव आहे. अमिता आणि सुरज यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यामुळे दोघांनी उमरोळी येथून घर सोडून वाणगाव येथील वृंदावन दर्शन इमारतीमध्ये राहायला आले होते. पण पहिल्याच रात्री आरोपी सुरजने अमिताचा गळा दाबून खून केला. आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने तिचा मृतदेह भिंतीमध्ये बांधकाम करून पुरून टाकला.
त्याननंतर चार महिन्यांपासून आरोपी सूरज हा दुसऱ्या ठिकाणी राहत होता. या घटनेचा संशय मृत मुलीच्या नातेवाईकांनी आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलीसानी घटनेचा तपास केला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
प्रेयसीच्या कुटुंबीयांशी करत होतो चॅट!
अमिता मोहिते चार महिन्यांपूर्वी प्रियकरासोबत घर सोडून गेली होती. पण परत आली नाही आणि त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू ठेवला होता. दरम्यान मुलीचा प्रियकराने तिचा सोशल मीडियाचे अकाउंट वापरत होता आणि व्हॉट्सअॅपवरुन मुलीच्या कुटुंबाशी संपर्क साधत होता. त्यामुळे आपली मुलगी जिवंत असल्याचे भासविले जात होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांना याबद्दल संशय निर्माण झाला. त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात याबद्दल फिर्याद दिली.
त्याच फ्लॅटमध्ये 4 महिन्यांपासून राहत होता
पोलिसांनी तपास सुरू केला असता मोबाईलच्या लोकेशनवरून आरोपी सूरजला पकडण्यात आले. सूरजने अमिताची हत्या केल्याची कबुली दिली. तसंच अमिताची हत्या करून तिचा मृतदेह भिंतीत पुरला होता आणि चार महिन्यांपासून त्याच भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होतो, अशी कबुली त्याने दिली. विशेष बाब म्हणजे, या तरुणाने सपाट भिंतीमध्ये महिलेचा मृतदेह पुरला होता. आणि नंतर स्वत:साठी सुद्धा भिंत उभी केली होती. पोलिसांनी आरोपी सूरजला बेड्या ठोकल्या असून अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.