मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

एका Commentमुळे मेडिकलच्या चौथ्या वर्षांतील विद्यार्थ्याची हत्या; कॉलेज परिसरातच घातली गोळी

एका Commentमुळे मेडिकलच्या चौथ्या वर्षांतील विद्यार्थ्याची हत्या; कॉलेज परिसरातच घातली गोळी

कॉलेज परिसरात हा सर्व प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

कॉलेज परिसरात हा सर्व प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

कॉलेज परिसरात हा सर्व प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : गुरुग्राममधील एसजीटी विद्यापीठात (SGT University in Gurugram) गर्लफ्रेंडवर कमेंट करण्याचा सूड उगवण्यासाठी लॉच्या विद्यार्थ्याने शुक्रवारी दुपारी पार्किंगजवळील मेडिकलच्या विद्यार्थ्याच्या पोटात गोळी (Murder) झाडली. गोळी लागताच तो जागेवर कोसळला. यानंतर परिसरात खळबळ उडाली. काही विद्यार्थी तेथे पोहोचले व त्यांनी मेडिकलच्या विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात हलवलं. मात्र जास्त रक्तस्त्राव झाला कारण्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच डीसीपी वेस्टसह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळावरुन फिंगर प्रिंट आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. हर्ष या विद्यार्थ्याच्या जबाबानंतर लकीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (man murdered for commenting on girlfriend) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी एसजीटी विद्यापीठाच्या परिसरातील पार्किंगमध्ये दिल्लीतील नजफगड येथे राहणाऱ्या लकीने उत्तर प्रदेशातील शामली निवासी विनीत (22) याला गोळी झाडली. गोळी थेट त्याच्या पोटात लागली आणि तो जागेवरच कोसळला. यानंतर तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला रुग्णालयात हलविण्यात आलं, मात्र येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं, विनीत हा मेडिकलच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता. पोलिसांच्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार, एमएससी तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थीनीसोबत लकीची मैत्री होती. तिच्याबद्दल विनीतने काही कमेंट केली होती. ज्याचा सूड उगवण्यासाठी त्याने त्याची हत्या केली. तरी पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. पोलिसांनी पार्किंगमध्ये तैनात गार्डची चौकशी केली. गोळी मारल्यानंतर आरोपी तेथून फरार झाला. (Murder of a fourth year medical student due to a commenting on girlfriend, bullet was fired on the college premises) या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एका कमेंटमुळे तरुणाने मेडिकलच्या चौथ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यीची हत्या केली. महाविद्यालयीन काळात अशा प्रकारच्या घटना घडणं ही चिंता वाढवणारी बाब आहे. शिक्षण घेण्याच्या काळात मुलं गुन्हेगारी वळत असल्याचं या घटनांवरुन समोर येत आहे.
First published:

Tags: Boyfriend, Crime news, Delhi, Girlfriend, Murder

पुढील बातम्या