मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /गुंडांनी घेरल्यावर पळून गेला मित्र, एकाकी व्यापाऱ्याची निर्घृण हत्या

गुंडांनी घेरल्यावर पळून गेला मित्र, एकाकी व्यापाऱ्याची निर्घृण हत्या

लग्नावरून परत येत (Murder of a businessman after friend runs away) असताना गुंडांनी एका व्यापाऱ्याची निर्घृण हत्या केली आहे.

लग्नावरून परत येत (Murder of a businessman after friend runs away) असताना गुंडांनी एका व्यापाऱ्याची निर्घृण हत्या केली आहे.

लग्नावरून परत येत (Murder of a businessman after friend runs away) असताना गुंडांनी एका व्यापाऱ्याची निर्घृण हत्या केली आहे.

पटना, 25 नोव्हेंबर: लग्नावरून परत येत (Murder of a businessman after friend runs away) असताना गुंडांनी एका व्यापाऱ्याची निर्घृण हत्या केली आहे. गुंडांनी घेरल्यानंतर मित्र (Criminals murdered businessman) पळून गेल्यामुळे गुंडांना व्यापाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात यश आलं. लग्न समारंभ उरकून घरी जात असताना दोघांना गुंडांनी गाठत शस्त्रं बाहेर काढली. आपल्यावर होणारा हल्ला परतवून लावत मित्र तिथून पळून गेला. त्यानंतर गुंडांनी व्यापाऱ्याच्या चेहऱ्यावर एकामागन एक 40 वार (Businessman stabbed 40 times on face) करत त्याची हत्या केली.

असा झाला हल्ला

बिहारमधील छपरा भागात सोन्याचांदीचे व्यावसायिक अरुण शाह हे त्यांच्या मित्रासह एका लग्नाला गेले होते. परत येताना आपल्यावर खुनी हल्ला होईल, अशी कल्पनादेखील त्यांना नव्हती. मात्र अचानक झालेला हल्ला आणि मित्राने काढलेला पळ यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. आशिष श्रीवास्तव नावाच्या व्यापाऱ्याच्या मित्राने काही वेळानंतर शाह यांच्या घरी फोन करून घटनेची कल्पना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र ते पोहोचेपर्यंत अरुण शाह यांची हत्या करून मारेकरी फरार झाले होते.

पोलीस तपास सुरू

अरुण शाह यांचं कुणाशीही वैमनस्य नसल्याचं त्यांच्या भावानं सांगितलं आहे. पोलिसांनी शाह यांच्यासोबत असणारा त्यांचा मित्र आशिष श्रीवास्तवलाही अटक केली असून त्याच्याकडून या घटनेबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. स्वतः श्रीवास्तव हे देखील जखमी झाले असल्याची माहिती मिळत असून पोलिसांनी याबाबत अधिक काही बोलायला नकार दिला आहे.

हे वाचा-उत्तर कोरियात यापुढे लेदर जॅकेटवर बंदी, कारण वाचून होईल हुकूमशाहीची जाणीव

पुराव्यांचा शोध

या खुनामागे काही आर्थिक व्यवहारांचा संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. खून नेमका कुठल्या कारणासाठी केला गेला आणि खुनामागे नेमका कुणाचा हात आहे, याचे पुरावे हाती लागल्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. व्यापाऱ्याच्या हत्येमुळे परिसरात घबराटीचं वातावरण आहे.

First published:

Tags: Bihar, Crime, Murder, Murder Mystery