मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नराधम! चिमुकलीला चॉकलेटच्या बहाण्याने घेऊन गेला युवक, इमारतीत सापडला मृतदेह

नराधम! चिमुकलीला चॉकलेटच्या बहाण्याने घेऊन गेला युवक, इमारतीत सापडला मृतदेह

तीन वर्षाच्या मुलीला चॉकलेटच्या (Murder of 3 year old girl by a youth) बहाण्यानं घेऊन गेलेल्या तरुणानं तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

तीन वर्षाच्या मुलीला चॉकलेटच्या (Murder of 3 year old girl by a youth) बहाण्यानं घेऊन गेलेल्या तरुणानं तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

तीन वर्षाच्या मुलीला चॉकलेटच्या (Murder of 3 year old girl by a youth) बहाण्यानं घेऊन गेलेल्या तरुणानं तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

रायपूर, 24 ऑक्टोबर : तीन वर्षाच्या मुलीला चॉकलेटच्या (Murder of 3 year old girl by a youth) बहाण्यानं घेऊन गेलेल्या तरुणानं तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येपूर्वी या तरुणानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले (Police fears rape before murder) असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनं मुलीच्या आईवडिलांना आणि पूर्ण गावाला धक्का बसला आहे.

खेळायला गेलेली मुलगी गायब

ही घटना आहे छत्तीसगडमधल्या कोरबा भागातील. इथल्या आदिवासी भागातील एक 3 वर्षांची मुलगी रोजच्याप्रमाणं संध्याकाळी परिसरातील मुलांसोबत खेळत होती. रोज संध्याकाळी सर्वांसोबत खेळून ती अंधार पडल्यावर घरी येत असे. मात्र घटनेच्या दिवशी ती रोजच्या वेळी घरी न आल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी इतर मुलांकडे चौकशी केली.

कुटुंबीयांना समजली माहिती

तिच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी मुलगी गावातच राहणाऱ्या 25 वर्षांच्या अर्जून सिंगसोबत गेल्याचं सांगितलं. घरच्यांनी अर्जून सिंगच्या घरी जाऊन चौकशी केली असता तो घरातून गायब होता. अर्जून कुठे गेला, याची घरच्यांनाही कल्पना नव्हती. रात्रीपर्यंत अर्जून घरी परतला नाही. त्यामुळे सर्वांनी गावात मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली.

इमारतीत सापडला मृतदेह

एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत मुलीचा मृतदेह कुटुंबीयांना सापडला. ते पाहून मुलीच्या आईवडिलांना जबर धक्का बसला. मुलीचा मृत्यू झाला होता आणि तिच्या तोंडातून फेस येत होता. ही बातमी पाहता पाहता गावभर पसरली आणि सरपंचांनी फोन करून पोलिसांना याची कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला.

हे वाचा- समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे पुन्हा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

पोलिसांना लैंगिक अत्याचाराचा संशय

घटना घडल्यापासून संशयित अर्जून सिंग गायब आहे. तो गावात परतलेला नाही. त्यामुळे अर्जूनने या तीन वर्षांच्या मुलीसोबत काही विकृत कृत्य करून तिचा खून केला असावा, असा संशय पोलिसांना आहे. पोलीस सध्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा करत आहेत.

First published:

Tags: Chattisgarh, Crime, Murder