Home /News /crime /

मध्यरात्रीपर्यंत होता मित्रांसोबत, सकाळी सापडला मृतदेह, रिक्षाचालकाचा गूढ मृत्यू

मध्यरात्रीपर्यंत होता मित्रांसोबत, सकाळी सापडला मृतदेह, रिक्षाचालकाचा गूढ मृत्यू

मध्यरात्रीपर्यंत मित्रांसोबत (Friends) असणाऱ्या एका रिक्षाचालकाचा (Auto driver) मृतदेह (Dead Body) सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.

    रोहतक, 15 सप्टेंबर : मध्यरात्रीपर्यंत मित्रांसोबत (Friends) असणाऱ्या एका रिक्षाचालकाचा (Auto driver) मृतदेह (Dead Body) सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. रोजच्याप्रमाणे काम उरकल्यानंतर रात्री मित्रांसोबत या रिक्षाचालकाने वेळ घालवला. पहाटे 3 वाजेपर्यंत तो बाहेर होता. त्यानंतर तो आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला. मात्र सकाळी त्याचा खून झाल्याचं आढळलं. या घटनेने पोलीसदेखील चक्रावले असून त्याचा खून नेमका कसा झाला, याचा तपास सुरू आहे. हरियाणाच्या रोहतकमधील जसिया गावामध्ये एका 22 वर्षांच्या तरुणाची गळा चिरून हत्या झाल्याची घटना उघडकीला आली. गावातील नागरिकांनी या हत्येचा आरोप तरुणाच्या काही मित्रांवर लावला. पाच ते सहा मित्रांनी या तरुणाची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अशी घडली घटना हरियाणातील विकास नावाचा तरुण रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होता. दिवसभर रिक्षा चालवून झाल्यानंतर तो इतर रिक्षाचालक आणि त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत बसत असे. अनेकदा रात्रीच्या या गप्पांमध्ये वाद  आणि भांडणं होत असतं. काही दिवसांपूर्वी विकास मध्यरात्री 3 वाजेपर्यंत मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. त्यानंतर तो झोपण्यासाठी निघून गेला. मात्र त्यापूर्वी त्याचं मित्रांसोबत कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर काही तासांतच त्याचा खून झाला. हे वाचा - पेट्रोल ओतून पतीला पेटवलं; मग दगडानं ठेचून हत्या, सांगितलं धक्कादायक कारण पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रात्रीपर्यंत मित्रांच्या घोळक्यात असणाऱ्या विकासचा अचानक मृतदेह सापडल्यामुळे संशयाची पहिली सुई त्याच्या मित्रांकडे वळली आहे. विकासचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. संशयित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Haryana, Murder

    पुढील बातम्या