मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /गर्लफ्रेंडची हत्या करुन घरातच लपवली Dead Body, तब्बल 7 महिने तिच्या मृतदेहासह केलं वास्तव्य

गर्लफ्रेंडची हत्या करुन घरातच लपवली Dead Body, तब्बल 7 महिने तिच्या मृतदेहासह केलं वास्तव्य

एका व्यक्तीने लिव्ह-इनमध्ये सोबत राहणाऱ्या आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करुन, तिचा मृतदेह तब्बल सात महिने घरात लपवून ठेवल्याची (Man hid girlfriends body for 7 months) घटना समोर आली आहे.

एका व्यक्तीने लिव्ह-इनमध्ये सोबत राहणाऱ्या आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करुन, तिचा मृतदेह तब्बल सात महिने घरात लपवून ठेवल्याची (Man hid girlfriends body for 7 months) घटना समोर आली आहे.

एका व्यक्तीने लिव्ह-इनमध्ये सोबत राहणाऱ्या आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करुन, तिचा मृतदेह तब्बल सात महिने घरात लपवून ठेवल्याची (Man hid girlfriends body for 7 months) घटना समोर आली आहे.

  मिशिगन, 07 ऑगस्ट: एका व्यक्तीने लिव्ह-इनमध्ये सोबत राहणाऱ्या आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करुन, तिचा मृतदेह तब्बल सात महिने घरात लपवून ठेवल्याची (Man hid girlfriends body for 7 months) घटना समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील मिशिगनमध्ये घडला आहे. पकडला गेल्यानंतर या व्यक्तीने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल (Michigan man kills girlfriend) केला.

  मॅथ्यू लेविंस्की असं आरोपीचं नाव आहे. 37 वर्षीय मॅथ्यू हा आपली गर्लफ्रेंड जेरी विंटर्स हिच्यासोबत लिव्ह-इनमध्ये (Man kills live-in partner) राहत होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेरीने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. मॅथ्यूला तिचा हा निर्णय अजिबात आवडला नव्हता. याबाबत त्याने आपल्या मित्राजवळ नाराजी व्यक्त केली होती. ती परत आल्यास आपण तिला घरातच घेणार नसल्याचं मॅथ्यू या मित्राला म्हणाला होता.

  हे वाचा-पती अन् त्याच्या मैत्रिणीचा FBवर विकृत उद्योग; छळाला कंटाळून शिक्षिकेनं दिला जीव

  पुढच्याच महिन्यात, म्हणजे डिसेंबर 2020 मध्ये जेरी मॅथ्यूच्या घरी परत आली होती. यावेळी त्यांच्यात बरेच वाद आणि भांडणे झाली. या भांडणांदरम्यानच मॅथ्यूने जेरीची हत्या (Michigan man killed girlfriend) केली. आज तकने याबाबत वृत्त दिलं आहे. यानंतर त्याने तिचा मृतदेह तळघरात लपवून (Man hides girlfriends body in basement) ठेवला. एवढंच नाही, तर त्याने या मृतदेहाच्या पाठीच्या त्वचेचा मोठा भाग काढून टाकला होता. या घटनेच्या तब्बल सात महिन्यांनी मॅथ्यूच्या बहिणीला घरातील हा मृतदेह (Man hid GFs body in house) दिसला, ज्यामुळे हा सर्व प्रकार समोर आला. यानंतर पोलिसांनी मॅथ्यूला अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये मॅथ्यूने आपणच हत्या केल्याचे कबूल केले.

  हे वाचा-दारूसाठी धान्य विकणाऱ्या मुलाला आईनं रोखलं; लेकानं माऊलीला दिल्या नरक यातना

  याबाबत शेजाऱ्यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की आजूबाजूला गेल्या काही महिन्यांपासून कुबट वास येत होता. मात्र एखादे जनावर मेले असावे असा विचार करुन शेजारी या दुर्गंधीकडे दुर्लक्ष करत होते. दरम्यान मीडिया अहवालानुसार, जेरीच्या एका मैत्रिणीने सांगितले, की गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जेरी आणि मॅथ्यूचा साखरपुडा झाला होता. यावेळचे काही फोटोही जेरीने आपल्या फेसबुकवरुन शेअर केले होते, ज्यामध्ये हे दोघेही अगदी आनंदी दिसत होते.

  मॅकम्ब काऊंटी जेलमधील माहितीनुसार, मॅथ्यूवर हत्येसोबतच बॉडी म्युटेशनचाही (Body Mutation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच मृतदेहाची हेळसांड केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

  First published:

  Tags: Crime, Crime news