नवी दिल्ली : पाच दिवसांपूर्वी मित्राला उधार दिलेले पैसे घेण्यासाठी चाललो आहे असं सांगून घराच्या बाहेर पडलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या तरुणाचा मृतदेह नायलॉनच्या दोरीने बांधून झिंगरिया धबधब्याच्या परिसरात असलेल्या पाण्यामध्ये फेकून देण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या तरुणाच्या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर त्याच्या डोक्यात एखाद्या जड लोखंडी वस्तुने प्रहार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. अखेर या तरुणाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. प्रवीण सिंह असं या तरुणाचं नाव आहे.
तरुणाची ओळख पटली
घटनेबाबत अधिक माहिती अशी की छिंदवाडा जिल्ह्यातील झिंगरिया धबधब्याच्या परिसरात पोलिसांना एक मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन केल्यानंतर या तरुणाची हत्या झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. मात्र हत्या झालेल्या तरुणाची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. पोलिसांना मृत तरुणाची ओळख पटवण्यात यश आलं आहे. प्रवीण सिंह वय 45 असं हत्या झालेल्या या तरुणाचं नाव आहे. प्रवीण हा चंदनगावमधील माता मंदिर कॉलनी येथील रहिवासी आहे.
हेही वाचा : सख्या मुलीसारखा जीव लावला, पण शेवटी तिनेच आई-बाबांचा काटा काढला; भावालाही संपवण्याचा होता प्लॅन
पती हरवल्याची तक्रार
प्रवीण सिंह हा वीस नोव्हेंबर रोजी मित्राला दिलेले उसने पैसे परत घेण्यासाठी जातो असे सांगून बाहेर पडला होता. मात्र तो घरी परतलाच नाही. त्यानंतर 21 नोव्हेंबरला त्यांच्या पत्नीने तो हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. तक्रार दाखल होताच पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला होता. मात्र त्यानंतर 23 तारखेला या तरुणाचा मृतदेह दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. यामुळे आता या खूनाचं गूढ आणखी वाढलं आहे.
हेही वाचा : बीड : वृद्ध काका-काकू घरात असताना तो आला अन् अंगणात रक्ताचा सडा
20 पासून होता गायब 23 ला हत्या
समोर आलेल्या माहितीनुसार प्रवीण सिंह हा एका कॉलसेंटरमध्ये मॅनेजर होता. मित्राला दिलेले पैसे घेण्यासाठी बाहेर जातो आहे असं सांगून तो घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या पत्नीने प्रवीण सिंह हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र त्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला. तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Madhya pradesh, Murder