Home /News /crime /

इंटरनॅशनल बाइक रायडरचा रॅलीदरम्यान मृत्यू; हत्येचं कारण समोर येताच पोलिसांनाही बसला धक्का!

इंटरनॅशनल बाइक रायडरचा रॅलीदरम्यान मृत्यू; हत्येचं कारण समोर येताच पोलिसांनाही बसला धक्का!

बाईक रायडर त्या दिवशी एका रॅलीत सहभागी झाला होता.

  जयपूर, 16 मे : इंटरनॅशनल बाइक रायडरची (International Bike Rider) हत्या त्याच्याच पत्नीने प्लान केल्याचा धक्कादायक (Rajasthan News) खुलासा झाला आहे. पोलिसांनी कर्नाटकातून रायडरच्या पत्नीला अटक केली आहे. हत्येच्या मागे अवैध संबंध आणि संपत्तीचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. महिलेचे अन्य तरुणासोबत अवैध संबंध होते. याशिवाय पतीसोबत तिचं भांडण होत होतं. पतीला रस्त्यातून हटवण्यासाठी तिने मित्रांच्या मदतीने पतीची हत्या केली. ही हत्या जैसलमेरमध्ये 4 वर्षांपूर्वी झाली होती.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 वर्षांपूर्वी 16 ऑगस्ट 2018 रोजी इंटरनॅशनल बाइक रायडर असबाक मोन (34) यांच्या दोन मित्रांनी गळ्यावर लोखंडी हत्याराने हत्या केली होती. हत्येनंतर त्याचा मृतदेह टेकडीवरुन खाली फेकून देण्यात आला होता. असबाकचा फोनदेखील त्याचा मित्र संजय आपल्या सोबत घेऊन गेला होता. पोलिसांच्या तपासात रायडरची पत्नीही हत्येत सामील असल्याचं समोर आलं. 13 मे रोजी रायडरच्या पत्नीला अटक करण्यात आली. याशिवाय तिला 10 दिवसांच्या रिमांडवर घेण्यात आले आहे.

  पोलिसांनी सांगितलं की, हत्येनंतर आरोपी महिला आणि त्याच्या मित्रांचा पाठलाग करीत होते. एक वर्षापूर्वी हत्येत सामील असलेले संजय कुमाक आणि विश्वासला अटक करण्यात आली होती. मात्र महिला वारंवार आपली जागा बदलत होती. याशिवाय मोबाइल नंबरदेखील बदलत होती.

  असबाक मोन कन्नूर केरळचा राहणारा होता. काही वर्षांपासून तो बंगळुरूच्या आरटी नगरमध्ये राहत होता. ऑगस्ट 2018 मध्ये इंडियन बाजार मोटर स्पोर्ट्स डकार चँलेंज रॅलीदरम्यान तेथे पाच मित्र संजय, विश्वास, नीरज, शाकिब आणि संतोषसोबत जैसलमेरमध्ये रॅलीत भाग घेण्यासाठी आला होता.  15 ऑगस्ट 2018 रोजी शाहगढ़ बल्जमध्ये रायडिंग ट्रॅक पाहिल्यानंतर असबाक आणि त्याचे मित्र 16 ऑगस्ट रोजी रायडिंग करण्यासाठी निघाला होता.

  सर्वजणं रस्ता भटकले होते, मात्र मोनव्यतिरिक्त सर्वजणं परतले. 17 ऑगस्ट रोजी मोनचा मृतदेह सापडला. त्याची बाइक स्टँडवर उभी होती आणि त्यावर हेल्मेट ठेवलं होतं. जेथे मृतदेह सापडला तेथे मोबाइल नेटवर्कदेखील नव्हतं. सुरुवातील हा सामान्य मृत्यू असल्याचं मानलं जात होतं. मात्र तपासानंतर पत्नीनेच पतीच्या हत्येचं कारस्थान रचल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Crime news, Rajasthan

  पुढील बातम्या