मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

गाडी को टाइम है म्हणत त्याने वेफर्स-कोल्ड्रिंग ऑफर केलं, पुढे जे घडलं ते मुंबईला हादरवणारं

गाडी को टाइम है म्हणत त्याने वेफर्स-कोल्ड्रिंग ऑफर केलं, पुढे जे घडलं ते मुंबईला हादरवणारं

अज्ञात व्यक्तीवर भरवसा ठेवून पीडित थांबला. दोघांनी वेफर्स एकत्र खाल्ले. त्यानंतर अज्ञाताने कोल्ड्रिंग ऑफर केलं. ते घेतलं आणि दोघंही वेटिंग रुमकडे जाण्यासाठी निघाले.

    मुंबई : प्रवास करताना आपल्याला कोणाची तरी मदत लागते. कधीतरी काहीतरी आपण पटकन विचारतो किंवा आपल्याला कोणी माहिती दिली तर आपण पटकन सांगतोही. कधीतरी हेच धोक्याचंही ठरू शकतं. मदत करून प्रवाशालाच गंडवल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गाडीची वाट पाहणाऱ्या एका व्यक्तीला अनोळखी व्यक्तीनं माहिती विचारली. त्याने आपल्याला रिचार्ज करायचा असल्याचं सांगितलं. रिचार्जसाठी त्या अनोखळी व्यक्तीनं मदत केली. यावेळी इतर माहिती विचारून घेतली. तेव्हा पीडित व्यक्तीनं आपल्या मूळ गावी याचं असल्याचं सांगितलं. त्यावर त्या अज्ञात व्यक्तीनं गाडीला वेळ आहे. तोपर्यंत गप्पा मारू असा सल्ला दिला. अज्ञात व्यक्तीवर भरवसा ठेवून पीडित थांबला. दोघांनी वेफर्स एकत्र खाल्ले. त्यानंतर अज्ञाताने कोल्ड्रिंग ऑफर केलं. ते घेतलं आणि दोघंही वेटिंग रुमकडे जाण्यासाठी निघाले. त्यानंतर नेमकं काय घडलं हे पीडित व्यक्तीलाही आठवत नाही. तब्बल ४८ तासांनी वेटिंग रुममध्ये या व्यक्तीला जाग आली. पीडित तरुण कुवेतवरून आला होता. त्याला आपल्या मूळ गावी आंध्र प्रदेशला जायचं होतं. त्यांची गाडी दुपारी साडे बाराची होती. रिझर्व्हेशन असल्याने ते सीएसएमटी स्थानकातील वेटिंग रूममध्ये बसले होते. त्यावेळी हा सगळा प्रकार घडल्याचं त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं. पीडित तरुणाचे सगळे सामना लंपास करण्यात आलं होतं. त्यांना या सगळ्याची कल्पना येईपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांना कोल्ड्रिंगमधून गुंगीचं औषध देण्यात आलं होतं. ज्यामुळे ते वेटिंग रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांना जेव्हा जाग आली तेव्हा ते सेंट जॉर्ज रुग्णालयात होते. अनोळखी व्यक्तींने दिलेली कोणतीही गोष्ट घेऊ नका. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. अशा प्रवाशांपासून नेहमी सतर्क राहावं असं आवाहन पीडित व्यक्तीनं केलं आहे. अशा प्रसंगांना टाळायचं असेल तर तुम्ही तुमची खरी माहिती देखील अनोळखी व्यक्तीला देणं चुकीचे आहे. यामुळे गैरफायदा घेतला जाण्याचीही शक्यता आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Crime, Mumbai, Mumbai local

    पुढील बातम्या