मुंबई, 19 जानेवारी: मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. एका टीव्ही अभिनेत्रीने (TV Actress from Mumbai) वैमानिकावर गंभीर आरोप केले आहेत. या पायलटने लग्नाचं वचन देऊन तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. याप्रकरणी मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात (Oshiwara Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात या अभिनेत्री तक्रार केली होती, त्यानंतर सोमवारी ओशिवारा पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) नोंदवण्यात आली आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही आहे.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाची चौकशी सब इन्स्पेक्टर जावेद कराडकर करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांची भेट मॅट्रिमोनियल साइटवर (Matrimonial Site) झाली होती. तक्रारीमध्ये नमुद केल्यानुसार हा वैमानिक भोपाळ (Bhopal) याठिकाणचा आहे. दोघांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बातचीत होत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 दिवसांपूर्वी आरोपीने पीडितेचं घर पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती.
(हे वाचा-'त्याने जियाला टॉप उतरवायला सांगितला...' Jiah Khan च्या बहिणीचा साजिद खानवर आरोप)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या अभिनेत्रीच्या तक्रारीत असं म्हटलं आहे की ती मुंबईत एकटी राहते. लग्नाचं वचन देणाऱ्या वैमानिकाने घर पाहण्याची इच्छा व्यक्त केल्याने तिने त्याला होकार दिला. मात्र घरी आल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. त्याने तिला आई-वडिलांना भेटवण्याचेही वचन दिले होते, पण ते पूर्ण केले नाही. याप्रकरणाचा पुढील तपास अद्याप मुंबई पोलिसांकडून सुरू आहे.