• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • भावी पत्नीला अश्लील मेसेज पाठवणं गुन्हा? त्या प्रकरणावर मुंबई सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

भावी पत्नीला अश्लील मेसेज पाठवणं गुन्हा? त्या प्रकरणावर मुंबई सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

सत्र न्यायालयाने (Sessions Court) आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, लग्नाआधी भावी पत्नीला पाठवलेले असे मेसेज एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी असू शकतात

 • Share this:
  मुंबई 20 नोव्हेंबर : भावी पत्नीला अश्लील मेसेज (Obscene Messages) पाठवणं गुन्हा आहे का? मुंबईच्या एका न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. न्यायालयाने लग्नाचे आमिष देत बलात्कार केल्याच्या आरोपाच्या प्रकरणात एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. यावेळी निर्णय देताना न्यायालयाने म्हटलं की लग्नाआधी भावी पत्नीला अश्‍लील मेसेज पाठवणे हा एखाद्याच्या प्रतिष्ठेचा अपमान होऊ शकत नाही. सत्र न्यायालयाने (Sessions Court) आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, लग्नाआधी भावी पत्नीला पाठवलेले असे मेसेज एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी असू शकतात. यामुळे संबंधित महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान होऊ शकत नाही. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, एका 36 वर्षीय व्यक्तीवर त्याच्या 11 वर्षांपूर्वी त्याच्या होणाऱ्या पत्नीने लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं म्हटलं की, जर एखाद्याला समोरची व्यक्ती आवडत नसेल, तर हे समोरच्याला सांगण त्या व्यक्तीचा अधिकार आहे आणि समोरच्या व्यक्तीनंही हे समजून घेत चूक टाळली पाहिजे. होणाऱ्या पतीनं पाठवलेल्या अश्लील मेसेजचा उद्देश आपली इच्छा होणाऱ्या पत्नीसमोर व्यक्त करणे तसंच लैंगिक भावना जागृत करणे असाही असू शकतो. कोर्टाने पुढे म्हटलं की या मेसेजमुळे होणाऱ्या पत्नीलाही आनंद होऊ शकतो. मात्र, असं म्हणता येणार नाही की यामुळे होणाऱ्या पत्नीच्या प्रतिष्ठेचा अपमान होईल. महिलेनं 2010 मध्येच या व्यक्तीविरोधात FIR दाखल केली होती. या कपलची 2007 मध्ये मेट्रीमोनियल वेबसाईटवरुन ओळख झाली. युवकाची आई या लग्नाच्या विरोधात होती. यामुळे 2010 मध्ये या युवकानं तरुणीसोबतचं आपलं नातं संपवलं. कोर्टाने या युवकाला निर्दोष घोषित करत म्हटलं की लग्नाचं वचन देणं आणि ते न पाळणं याला धोका देणं किंवा बलात्कार करणं म्हणता येणार नाही. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं, की युवक एका आर्य़ समाज हॉलमध्ये मंगळसूत्र घेऊन गेला होता. मात्र लग्नानंतर वारंवार होणारे वाद आणि त्यानंतरची परिस्थितीत बघता त्याने पाऊल मागे घेतलं आणि आपल्या आईचं म्हणणं ऐकलं. युवकाने आपल्या आईचा सल्ला ऐकत या समस्येचा सामना करण्याऐवजी यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तो हे सर्व हाताळू न शकल्याने त्याने माघार घेतली. त्यामुळे, हे लग्नाचं आमिष दाखवण्याचं प्रकरण नाही.
  Published by:Kiran Pharate
  First published: