Home /News /crime /

10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार

10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार

2010 मध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्यानंतर आरोपी घाबरला होता. त्यानंतर अनेक महिने त्याने गुन्हा केला नाही.

    दिवाकर सिंग, 16 आॅक्टोबर : नालासोपाऱ्यातून अटक करण्यात आलेला सीरियल रेपिस्ट रेहान कुरेशी यानं दोन हत्यांसह एकूण 19 गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये बलात्कार, विनयभंग आणि दोन हत्यांचा समावेश आहे. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुरेशीन कुर्ल्यातील नेहरूनगर येथील पोलीस वसाहतीत चिमुरडीची हत्या केल्याचं त्याच्या चौकशीदरम्यान कबुल केलंय. नवी मुंबई पोलिसाच्या ताब्यात असेला सीरियल रेपिस्ट रेहान कुरेशीचा भेसूर चेहरा जगासमोर आलाय. तो अल्पवयीन मुलींना वासनेची शिकार बनवत होता असं नाही, तर त्यांचा निर्घृणपणे खून करण्यासही मागे पुढे पाहात नव्हता. 2008 मध्ये मुंबईच्या कुर्ला नेहरुनगर परिसरात 5 आणि 9 वर्षांच्या दोन मुलींवर बलात्कार करुन त्यांचा खून करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी त्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी  958 लोकांची डीएनए तपासणी केली होती. मात्र गुन्ह्याचा छडा लावण्यात त्यांना यश आलं नाही. मात्र आता नवीमुंबई पोलिसांनी 2008च्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश मिळवलंय. नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  2010 मध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्यानंतर आरोपी घाबरला होता.त्यानंतर अनेक महिने त्याने गुन्हा केला नाही. मात्र पोलिसांची कारवाई थंड झाल्यानंतर तो कामासाठी परदेशातही गेला. दोन वर्षांनंतर भारतात परतल्यावर त्यानं पुन्हा चिमुरड्यांना सावज आपलं बनवलं. लहान मुलींना चॉकलेटचं आमिष देवून अत्याचार करत असे. सीरियल रेपिस्ट रेहान कुरेशीनं आजवर 19 लहान मुलींवर अत्याचार केला असून त्यान परदेशात आणि इतर राज्यातही अशा प्रकारे गुन्हे केले असावेत असा पोलिसांना संशय आहे.पोलीस अन्य राज्यातील पोलिसांकडून अशा प्रकारच्या गुन्हांची माहिती घेत आहे. आगामी काळात रेहान कुरेशीच्या आणखी काही गुन्हांचा उलगडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ===========================================
    First published:

    Tags: News, Rape, Rehan Qureshi

    पुढील बातम्या