मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /ड्रग्जची फॅक्टरी उद्ध्वस्त केली, पण तस्कर वकिलाचा मोबाईल कसा शोधायचा? मुंबई पोलिसांपुढे पेच

ड्रग्जची फॅक्टरी उद्ध्वस्त केली, पण तस्कर वकिलाचा मोबाईल कसा शोधायचा? मुंबई पोलिसांपुढे पेच

मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केलेल्या वकिलाच्या मोबाईलमधून धक्कादायक खुलासे होणार असून हा मोबाईल पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून अटक होण्याआधीच वकिलाने हा मोबाईल नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केलेल्या वकिलाच्या मोबाईलमधून धक्कादायक खुलासे होणार असून हा मोबाईल पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून अटक होण्याआधीच वकिलाने हा मोबाईल नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केलेल्या वकिलाच्या मोबाईलमधून धक्कादायक खुलासे होणार असून हा मोबाईल पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून अटक होण्याआधीच वकिलाने हा मोबाईल नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

    मुंबई, 19 नोव्हेंबर : अमली पदार्थांची (Drugs) निर्मिती करणाऱ्या एका फॅक्टरीचा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पर्दाफाश केलाय. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने राजकुमार राजहंस (Rajkumar Rajhans) नावाच्या एका मुंबईतील नामांकित वकिलाला (Lawyer) अटक केली आहे. मात्र अटक होण्याच्या भीतीने या वकिलाने आपल्या मोबाईलमधील सर्व गुपित पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी मोबाईल नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या मोबाईलचा शोध आता मुंबई पोलीस घेत आहेत.

    नेमकं प्रकरण काय?

    कोल्हापूरच्या चांदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे आपल्या फार्महाऊसवर या वकिलाने अमली पदार्थ बनवण्याची फॅक्टरी सुरू केली होती. हा वकील कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ मुंबईत आणून विकायचा. याच अमली पदार्थ तस्करी संबंधित मुंबईतील अनेक बडे मासे या वकिलाच्या संपर्कात होते. ही लोक कोण आहेत याचा शोध घेण्याकरता मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केलेल्या वकील राजकुमार राजहंस याची चौकशी केली. त्याच्या चौकशीतून एक धक्कादायक खुलासा झाला. ड्रग्स तस्करांची नावं समोर येऊ नये याकरता वकिलाने आपला मोबाईल पाण्यात फेकून दिला, असं तपासातून समोर आलंय. हा मोबाईल शोधण्याकरता गेले तीन दिवस मुंबई पोलीस डीप ड्रायव्हर्स (बुक्की मारून शोधणारा) यांच्या मदतीने शोध घेत आहेत.

    वकिलाचा हायप्रोफाईल लोकांशी संबंध

    या मोबाईलमध्ये असं काय होतं ज्यामुळे या वकिलाने आपला मोबाईल पाण्यात फेकून दिला? हे जाणून घेण्याकरता पोलीस या वकीलाच्या सर्व मोबाईलची डिटेल्स काढत आहेत. त्याचे सोशल मीडिया अकाउंट, मेसेजेस, फोनचे डिटेल्स तपासले जात आहेत. कारण राजकुमार राजहंस हा मुंबईतील एक नामांकित वकील असून त्याचे संबंध अनेक हाय प्रोफाईल लोकांशी आहेत. या नामांकित वकिलासोबत काही बडी नावे जोडलेली आहेत का? याचाही शोध मुंबई पोलिसांना घ्यायचा आहे.

    हेही वाचा : रेकॉर्डवरील फरार आरोपी थेट अनिल देसाईंच्या स्वागताला

    पोलिसांनी वकिलाला कसं पकडलं?

    क्रिस्टीना, सिमरन, आयेशा अशी वेगवेगळी नावे बदलून एक महिला मुंबईत अमली पदार्थ सर्रासपणे विकत होती. या महिलेला याच महिन्यातील 13 तारखेला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला या महिलेबाबत गुप्त माहिती मिळाली होती. ज्या वेळेस या महिलेला अटक केली त्यावेळेस तिच्या ताब्यात 50 ग्रॅम एमडी सापडले होते. या महिलेच्या चौकशीतून या वकिलाचे नाव समोर आले होते.

    हेही वाचा :  ST महामंडळाचं खरंच खासगीकरण होणार का? अनिल परबांनी दिलं 'हे' उत्तर

    अमली पदार्थ प्रकरणी या महिलेची आणि वकिलाची एकदा भेट झाली होती. यानंतर या महिलेच्याच एका प्रकरणाचे वकीलपत्र नामांकित वकील राजकुमार राजहंस यांनी घेतले होते. याच दरम्यान या दोघांची ओळख झाली. नंतर राजकुमार राजहंस हा अमली पदार्थ तस्करी करु लागला. सध्या ही महिला आणि हा नामांकित वकील मुंबई पोलिसांच्या कोठडीत आहे. दुसरीकडे या वकिलाचा मोबाईल शोधणे हे मुंबई पोलिसांसाठी कठीण होऊन बसलं आहे.

    First published:

    Tags: Crime, Drugs, Mumbai police