मध्यरात्री करायचा 'हे' काम, तक्रार झाल्यावर पोलिसांनी केली अटक

मध्यरात्री करायचा 'हे' काम, तक्रार झाल्यावर पोलिसांनी केली अटक

मध्यरात्री लोकांच्या घराची बेल वाजून पळून जाणाऱ्या व्यक्तीसोबत असं की झालं की तुम्हालाही बसेल धक्का.

  • Share this:

मुंबई 17 जानेवारी : लहानपणी तुम्ही  वेगवेगळ्या प्रकारच्या  खोड्या केल्या असतील. त्यामध्ये लोकांच्या दाराची कडी वाजवून  पळून जाण्याची खोड तर सगळ्यांनीच केली असेल. मात्र कोणी हा विचार केला नसेल की,  लोकांच्या घराची बेल वाजून पळून गेलेल्या व्यक्तीला अटक सुद्धा होऊ शकते. हो असं खरंच घडलंय. तुम्हालाही हे ऐकून विश्वास बसणार नाही. या कारणासाठी अटक होऊ शकते.  अशीच एक घटना चक्क मुंबईत घडली आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास रोज लोकांच्या घराच्या दारांची बेल वाजयची मात्र ही बेल कशामुळे वाजायची याचा उलगडा होऊ शकत नव्हता. अखेर एक दिवस ही बेल 37 वर्षीय तरुणच वाजवत असल्याचं लक्षात आलं. त्याच्या या वर्तवणुकीला वैतागून परिसरातील लोकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी 37 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आलं आहे. तो व्यक्ती मध्यरात्री त्याच्या परिसरातील लोकांच्या घराची  बेल वाजून पळून जायचा. रोजच्याप्रमाणे तो एके दिवशी सराफाच्या घराची बेल वाजून पळत होता तेव्हा  परिसरातील लोकांनी त्याला पकडले. पकडल्यानंतर लोकांनी त्याला विचारले की, तू का लोकांच्या घराची बेल वाजून पळत आहे? मात्र त्यावर तरुणानं कोणतही उत्तर दिलं नाही तो पळ काढण्याच्या तयारीत होता. लोकांनी त्या घेरल्यानं तिथे थोडी धक्काबुक्की झाली. त्याला न जुमानता स्थानिकांनी तरुणाला पोलिसाच्या ताब्यात दिले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तरुणाला अपरात्री बेल वाजवण्याची सवय होती. बेल वाजवत असताना तरुण हा दारुच्या नशेत होता. अशी माहिती प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी दिली आहे. तरुणाला अटक केल्यानंतर आणखी चार कुटुंबीयांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला .

First published: January 17, 2020, 3:40 PM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या