दोस्त दोस्त ना रहा! मुंबईतील मर्डर मिस्ट्रीचा 105 दिवसांनंतर धक्कादायक खुलासा

दोस्त दोस्त ना रहा! मुंबईतील मर्डर मिस्ट्रीचा 105 दिवसांनंतर धक्कादायक खुलासा

मुंबईतल्या घडलेल्या हत्येचा छडा लावण्यात तब्बल 105 दिवसांनी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.

  • Share this:

मुंबई, 07 ऑक्टोबर : मुंबईतल्या घडलेल्या हत्येचा छडा लावण्यात तब्बल 105 दिवसांनी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. मुंबई पोलिसांची नजर चुकवणाऱ्या आरोपीच्या अखेर पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत. या आरोपीनं आपल्या मित्राची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. एका क्षुल्लक कारणातून वाद झाला आणि हत्येपर्यंत प्रकरण पोहोचलं. त्यानंतर हा आरोपी पोलिसांची नजर चुकवण्यासाठी फुटपाथवर राहात होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मित्रांमध्ये दारूवरून वाद झाला. 60 वर्षीय आरोपी श्रीधर यलमलई हरिजन याचा त्याच्या मित्रासोबत 28 जून रोजी दारूवरून वाद झाला. सुरुवातीला हा वाद शाब्दिक झाला आणि त्याचं नंतर रुपांतर मारमारीत आणि हत्येत झालं. श्रीधरच्या डोक्यात याच रागाची तिडीक गेली आणि त्यानं धारदार शस्रानं वार करून आपल्या मित्राची हत्या केली आणि तिथून फिरार झाला.

हे वाचा-ग्रामपंचायत सेवकाची डोक्यात गोळी झाडून हत्या, सख्ख्या भावाला शार्प शूटरसह अटक

ज्य़ेष्ठ अधिकारी पीआय संजीव भोळे यांच्या माहितीनुसार आरोपी फुटपाथवर राहात होता. हा आरोपी मजूर आहे त्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा छ़डा लावणं जास्त आव्हानात्मक होतं. याचा तपास कऱण्यासाठी पोलिसांनी एक विशेष टीम दाखल केली होती. मृत व्यक्तीच्या हातावर असलेला नावाच्या आधारे पोलिसांनी तपासाची सुरुवात केली आणि अखेर 105 दिवसांनंतर त्याचा उलगडा झाला. आरोपी श्रीधरच्या पोलिासांनी फुटपाथवरून ताब्यात घेतलं आहे. दारूवरून हा वाद झाल्याचं तपासातून समोर आलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 7, 2020, 1:35 PM IST

ताज्या बातम्या