मुंबई, 16 ऑक्टोबर : मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्सविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू आहेत. त्यातच आता मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्सविरोधात मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय बाजारात 2 कोटी 40 लाख रुपये किंमत असणारे 1 किलो 200 ग्रॅम ड्रग्स जप्त केलेलं आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने ही मोठी कारवाई केली असून ड्रग्स तस्करी करणाऱ्या आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटला 14 तारखेला मिळालेल्या माहितीनुसार, धारावी परिसरातल्या 90 फिट रोड परिसरात ड्रग्सची तस्करी करण्यासाठी एक इसम येणार असल्याचे कळलं होतं. त्यानुसार, घाटकोपर अमली पदार्थ विरोधी पथकाच्या युनिटने सापळा रचला आणि संशयित इसमाला बेड्या ठोकल्या. त्याची झाडाझडती घेतल्यावर त्याच्याकडून हेरॉईन ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तब्बल 2 कोटी 40 लाख रुपये आहे.
एकनाथ खडसेंच्या 'त्या' भेटीबद्दल अजित पवारांनी केला खुलासा, म्हणाले...
घाटकोपर अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केलेल्या या आरोपीचे नाव मनझार दिन मोहमद शेख (47) असं आहे. यापूर्वी सुद्धा 2018 साली त्याच्यावर घाटकोपर युनिटनेच ड्रग्सविरोधात कारवाई केली होती. आरोपी शेख हा मुंबई आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सची विक्री करत असल्याचं समोर आले आहे. हेरॉईन ड्रग्स महाग असल्यामुळे हे ड्रग्स विकत घेणारे नक्की कोण आहेत याचाही शोध पोलीस घेणार आहेत.
नव्या पोलीस आयुक्तांच्या 'लेटर बॉम्ब'मुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ
मुंबईत ड्रग्सविरोधात होणाऱ्या कारवाया पाहता आरोपीकडून जप्त करण्यात आलेले ड्रग्स मुंबईत नक्की कोणत्या मार्गाने येत हा प्रश्न नेहमी निर्माण होतो. हेरॉईन,कोकेन, मेफिड्रिन, यासारख्या असंख्य प्रकारच्या ड्रग्सची मुंबईत तस्करी केली जाते. या ड्रग्सची मागणी करणाऱ्यांची संख्याही तितकीच मोठी आहे. काही दिवसांपूर्वीच सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एनसीबीने ड्रग्स अँगलने तपास केला. यामध्ये अनेक हायप्रोफाईल व्यक्ती सुद्धा ड्रग्सच सेवन करत असल्याची माहिती समोर आली होती. मुंबई ड्रग्स तस्करीचे हब बनत आहे का असा प्रश्न आता विचारला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.