मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /विराटच्या चिमुरडीवर अत्याचार करण्याची धमकी देणारा निघाला इंजिनिअर! मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विराटच्या चिमुरडीवर अत्याचार करण्याची धमकी देणारा निघाला इंजिनिअर! मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू विराट कोहलीच्या मुलीवर अत्याचार (Rape Threat to Virat Kohli's 10-Month-Old Daughter) करण्याची धमकी देणाऱ्या नराधमाला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे.

भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू विराट कोहलीच्या मुलीवर अत्याचार (Rape Threat to Virat Kohli's 10-Month-Old Daughter) करण्याची धमकी देणाऱ्या नराधमाला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे.

भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू विराट कोहलीच्या मुलीवर अत्याचार (Rape Threat to Virat Kohli's 10-Month-Old Daughter) करण्याची धमकी देणाऱ्या नराधमाला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे.

मुंबई, 10 नोव्हेंबर: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या मुलीवर अत्याचार (Rape Threat to Virat Kohli's 10-Month-Old Daughter) करण्याची धमकी देणाऱ्या नराधमाला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ही कामगिरी केली असून अटक करण्यात आलेल्या आरोपीला मुंबईत आणण्यात येत आहे. न्यूज18 ला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीचे नाव रामनागेश अलीबथिनी असून त्याचे वय 23 वर्षे आहे (Ramnagesh Srinivas akubathini, 23).

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे लज्जास्पद कृत्य करणारा हा आरोप सुशिक्षित असून सध्या त्याचे शिक्षण सुरू आहे. याआधी तो फूड डिलिव्हरी अॅपसाठी सॉफ्टवेअरचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित आरोपी हा सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याचे समोर आले आहे.

हे वाचा-हैवान! देहविक्रयासाठी पतीचा दबाव, नकार दिल्यामुळे केलं पत्नीचं मुंडण

विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारताचा पाकिस्तानविरोधात पराभव झाला होता. टीम इंडियाच्या पाकिस्तानविरुद्ध (T20 World Cup, IND vs PAK) पराभवानंतर या घटनेला धार्मिक रंग देत मोहम्मद शमीला (Mohammad Shami) टीकेचा धनी ठरवण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या समर्थनात अनेकजण उभे राहिले होते, त्यापैकी विराटही एक होता.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेदेखील (Virat Kohli) शमीला पाठिंबा दिला. मात्र, काही माथेफिरुंनी विराटला लक्ष्य केले. एवढे करून हे नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी ट्विटरवर विराटच्या अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्याच्या धमक्या  दिल्याची माहिती समोर आली होती.

हे वाचा-'टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये मुंबई-दिल्ली असे दोन गट' या खळबळजनक दावा

या प्रकरणात सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. त्यामध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुलगी वामिकावर अत्याचार करण्याची धमकी देण्यात आल्याचे दिसत होते. इतकेच नव्हे तर विराट आणि अनुष्काबद्दही चुकीचे भाष्य केले आहे. याच व्हायरल होणाऱ्या स्क्रीनशॉट नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

First published:
top videos

    Tags: Anushka sharma, Virat anushka, Virat kohli