• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • कळस! ऑनलाईन क्लासदरम्यान विद्यार्थ्याचं घाणेरडं कृत्य, महिला शिक्षिकेला दाखवला प्रायव्हेट पार्ट

कळस! ऑनलाईन क्लासदरम्यान विद्यार्थ्याचं घाणेरडं कृत्य, महिला शिक्षिकेला दाखवला प्रायव्हेट पार्ट

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नववीमध्ये शिकणाऱ्या या 15 वर्षीय विद्यार्थ्याला अटक केली आहे. विद्यार्थ्यानं ऑनलाईन क्लासदरम्यान आपला प्रायव्हेट पार्ट महिला शिक्षिकेला दाखवला (Student Showed his Private Part During Online Class) होता.

 • Share this:
  मुंबई 16 जून : कोरोना काळात शाळा आणि महाविद्यालयंही बंद असल्यानं बहुतेक ठिकाणी ऑनलाईन क्लास सुरू आहेत. मात्र, या क्लासदरम्यान अनेक विचित्र घटना घडल्याचं अनेकदा समोर येतं. आता अशीच आणखी एक घृणास्पद घटना समोर आली आहे. या घटनेत राजस्थानच्या एका विद्यार्थ्यानं आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्याचं समोर आलं आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नववीमध्ये शिकणाऱ्या या 15 वर्षीय विद्यार्थ्याला राजस्थानमध्ये जात अटक केली आहे. या विद्यार्थ्यानं ऑनलाईन क्लासदरम्यान आपला प्रायव्हेट पार्ट महिला शिक्षिकेला दाखवला (Student Showed his Private Part During Online Class) होता. वर्षभरात संपूर्ण कुटुंब संपलं; पतीच्या निधनानंतर महिलेची चिमुकल्यासह आत्महत्या टाइम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार, 15 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान ऑनलाईन क्लासमध्ये प्रायव्हेट पार्ट दाखवण्याची ही घटना अनेकदा घडली. यानंतर महिला शिक्षिकेनं क्लास बंद करण्यापर्यंतचा विचार केला होता. मात्र, नंतर पीडित शिक्षिकेनं मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात आरोपी विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकाऱ्यानं माहिती दिली, की पोलिसांनी आरोपीला राजस्थानमधून अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी मागील महिन्यातही मुंबई पोलिसांची टीम राजस्थानमध्ये गेली होती. जैसलमेरमधून आरोपी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. लग्नाचा प्रस्ताव नाकारला; संतप्त तरुणाने बंदुकीचा धाकावर कुटुंबाला ठेवलं ओलीस पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याकडून एक लॅपटॉप जप्त केला आहे. आरोपीनं आपल्या लॅपटॉपमध्ये गार्ड लावून ठेवलं होतं, जेणेकरून त्याचा आयपी अॅड्रेस ट्रॅक करता येऊ नये. या विद्यार्थ्यानं अत्यंत हुशारीनं हे कृत्य करत स्वतःचा चेहरादेखील लपवला होता. मात्र, एकदा या महिला शिक्षिकेनं आरोपीच्या बँकग्राऊंडचा स्क्रिनशॉट घेऊन ठेवला होता. याचमुळे तपासात पोलिसांना मदत झाली. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीनं सांगितलं, की त्यानं मस्करी म्हणून ऑनलाईन क्लासदरम्यान आपला प्रायवेट पार्ट दाखवला. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि यानंतर त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.
  Published by:Kiran Pharate
  First published: