...म्हणून मुंबई पोलीस आहे ग्रेट, तब्बल 1500 किमी पाठलाग करून आरोपीला ठोकल्या बेड्या!

...म्हणून मुंबई पोलीस आहे ग्रेट, तब्बल 1500 किमी पाठलाग करून आरोपीला ठोकल्या बेड्या!

पोलिसांनी जेव्हा श्याम शर्माची चौकशी केली असता त्याने मध्यप्रदेशमध्ये तोतया आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून अनेकांना लुटले होते. त्याच्यावर आधीपासून अनेक गुन्हे दाखल होते.

  • Share this:

मुंबई, 11 ऑक्टोबर : मुंबई (Mumbai) पोलीस दल हे जगभरात का नावाजलेले आहे, हे आज एका घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुंबईतील एका व्यापाऱ्याकडून 16 लाखांची खंडणी उकळणाऱ्या भामट्याला मुंबई पोलीस दलाच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. विशेष म्हणजे, खंडणी विरोधी पथकाने या आरोपीचा तब्बल 1500 किमी प्रवास केला आहे.  हा आरोपी तोतया आयपीएस अधिकारी होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केलेल्या बनावट आयपीएस अधिकाऱ्याचे नाव श्याम सुंदर सत्यनारायण शर्मा उर्फ एस एस शर्मा आहे.

श्याम शर्माने एका गुजराती व्यापाऱ्याला मुंबईतील चर्चगेट परिसरातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावले होते. आपण आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी श्याम शर्मा केली होती.  हा व्यापारी जेव्हा मुंबईतील अ‍ॅम्बेसडर हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा श्याम शर्माचा खरा चेहरा समोर आला. श्याम शर्माने या व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर त्याचे अपहरण केले आणि त्याच्या गाडीत त्याला बसवले. त्यानंतर मुंबई ते सूरत असा प्रवास केला. श्याम शर्माचे सूरतमध्ये घर होते. त्याने या व्यापाऱ्याला आपल्या घरात डांबून ठेवले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना फोन करून 16 लाखांची खंडणी मागितली.

तुरीच्या पिकासोबत शेतकऱ्याने केली कमाल, पोलीसही झाले हैराण

त्यानंतर या व्यापाऱ्याने त्याला 16 लाखांची रक्कम दिली. पैसे मिळाल्यानंतर  श्याम शर्मा व्यापाऱ्याला सोडून फरार झाला. तो फरार झाल्यानंतर व्यापाऱ्याने थेट सूरत पोलीस स्टेशन गाठले आणि आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर सूरत पोलिसांनी याबद्दल मुंबई पोलिसांना माहिती दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास हा मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला.

पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. त्यात आरोपीचा चेहरा हा स्पष्टपणे दिसून आला. त्यानंतर रेखाचित्र काढून त्याचा शोध सुरू केला. श्याम शर्माचा मोबाइल लोकेशन पोलिसांनी तपासले असता तो बडोद्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक बडोद्यात पोहोचले. पोलीस बडोद्यात पोहोचत नाही तेच  शर्मा सूरतमध्ये पोहोचला. त्यानंतर पोलिसांचे पथक सूरतकडे रवाना झाले. पण जेव्हा पोलीस सूरतमध्ये पोहोचले तेव्हा तिथून त्याने पळ काढला होता. त्याचे पुढील लोकेशन हे मुंबईतले दाखवत होते. त्यामुळे पोलिसांचे पथक पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.

एसटी बसच्या दारातला उभं राहून काढला VIDEO, नवनीत राणा वादात

आरोपीने आपला मोबाइल बंद केला होता. त्यामुळे त्याचा माग लागणे कठीण झाले होते. पण तरीही पोलिसांनी त्याचा पाठलाग सोडला नाही. मुंबईत आल्यानंतर हे पथक पाठलाग करत कर्नाटकात हुबळी इथं पोहोचले. आरोपी श्याम शर्मा ज्या प्रकार वेगवेगळी ठिकाणं बदलत होता, त्याचा अंदाज लावून पोलिसांनी सापळा रचला. हुबळी इथं पोहोचण्याआधी पोलिसांनी कर्नाटक पोलिसांना याची माहिती दिली. कर्नाटक पोलिसांनी हुबळी महामार्गावर नाकाबंदी केली. तेव्हा एक खासगी बस तिथे पोहोचली. पोलिसांनी या बसची तपासणी केली असता बसमध्ये श्याम शर्मा अखेर सापडला. पोलिसांनी तातडीने सुंदर शर्माच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी जेव्हा श्याम शर्माची चौकशी केली असता त्याने मध्यप्रदेशमध्ये तोतया आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून अनेकांना लुटले होते.  त्याच्यावर आधीपासून अनेक गुन्हे दाखल होते. सुंदर शर्मा हा मुळचा राजस्थान इथं राहणारा आहे. सुंदर शर्माला फाडफाड इंग्रजी बोलता येत होते. त्याचे राहणीमान सुद्धा एका आयपीएस अधिकाऱ्यासारखे होते. एवढेच नाहीतर तर या पठ्ठ्याकडे  पोलिसांच्या खाकी ड्रेससह स्टार सुद्धा होते. त्यामुळे त्याच्यावर लोकांना संशय येत नव्हता. अखेर मुंबई पोलिसांनी या भामट्याला जेरबंद केले असून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

Published by: sachin Salve
First published: October 11, 2020, 6:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या