Home /News /crime /

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरुन जाणाऱ्या आई-मुलाचा जागीच मृत्यू

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरुन जाणाऱ्या आई-मुलाचा जागीच मृत्यू

दोघेही माय-लेक रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

भिवंडी, 16 सप्टेंबर : भिवंडीतील (Bhiwandi) मुंबई - नाशिक महामार्गावरील (Mumbai-Nashik Highway) माणकोली जवळील लोढा धाम इथं एका अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात माय-लेकराचा (Mother and her boy) मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवर बसलेले नितीन काकडे (24) आणि  बेबीबाई काकडे (48)  या दोघांचा जागीच मृत्यू झाला. काकडे कुटुंबीय भिवंडी तालुक्यातील आमणे पाडा येथील रहिवाशी असून या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. सध्या राज्यासह अनेक भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. अनेक ठिकाणी तर जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. अशात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र असतं. त्यामुळे दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. (Mumbai Nashik highway Terrible accident on A mother and child on a two wheeler died on the spot) हे ही वाचा-अवघ्या काही सेकंदाने झाले बाजूला अन् कार आदळली टेम्पोवर, अपघाताचा LIVE VIDEO अपघातानंतर रस्त्यावरच दोघांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली होती. रक्ताच्या थारोळ्यात माय-लेकरं जमिनीवर पडले होते. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. मात्र तो व्हिडीओ इतका भयंकर आहे की, दाखवूही शकत नाही. दरम्यान काकडे यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Accident, Mother, Nashik

पुढील बातम्या