मुंबईतील धक्कादायक प्रकार! टिश्यू पेपरमुळे गमावला जीव, तक्रार केल्यामुळे वेटरनं डोक्यात फोडली लादी

मुंबईतील धक्कादायक प्रकार! टिश्यू पेपरमुळे गमावला जीव, तक्रार केल्यामुळे वेटरनं डोक्यात फोडली लादी

मुलुंडमध्ये असलेल्या एका ढाब्यावर नवनाथ जेवायला आले होते. दरम्यान जेवताना त्यांनी अस्वच्छ टिश्यू पेपरबद्दल तक्रार केली.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : मुंबईतील मुलुंड भागात एक खळबळजनक घटना घडली. एका टिश्यू पेपरवरून एका ग्राहकाची हत्या करण्यात आली. एक टिश्यू पेपरवरून वाद झाला आणि ग्राहकाला मारहाण करण्यात आली. मुलुंडमध्ये असलेल्या एका ढाब्यावर नवनाथ जेवायला आले होते. दरम्यान जेवताना त्यांनी अस्वच्छ टिश्यू पेपरबद्दल तक्रार केली. यातून वेटर आणि नवनाथ यांच्यात बाचाबाची झाली. त्यांनी नवनाथला मारहाण करण्यास सुरुवात केली. यात नवनाथ यांना जीव गमवावा लागला.

मुलुंड येथील नवघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ आपल्या मित्रासोबत ढाब्यावर जेवायला गेला होता. टिश्यू पेपरबाबत तक्रार केल्यानंतर वेटरनं नवनाथच्या डोक्यात टाईल्स फेकून मारली. यात नवनाथ जागीच कोसळला.

वाचा-बदला घेण्यासाठी TV अभिनेत्याची हत्या, पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा आरोप

त्याच्या मित्रानं त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र मेंदूला दुखापत झाल्यामुळे नवनाथचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस सध्या तिन्ही आरोपींची कसुन चौकशी करत आहे. वेटरसह मारहाणीत अजून किती लोकं सामिल होते, याचा शोध सुरू आहे.

वाचा-चप्पल घालून मंदिरात गेल्यामुळे हाणामारी,भाजप आमदार पडळकरांच्या भावावर गुन्हा

दरम्यान, या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. रामलाल गुप्ता, दिलीप भारती आणि फिरोज मोहम्मद खान अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत. नवनाथ यांनी अस्वच्छ टिश्यू पेपरवरून तक्रार केली. रागातून वेटरनं जेवण्यासाठी आलेल्या नवनाथला मारहाण करण्यास सुरुवात केली. नवनाथच्या वडिलांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर हत्येच्या गुन्ह्याखाली तिघांना अटक करण्यात आली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: November 18, 2020, 11:30 AM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading