मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मुंबईत माणुसकीला काळीमा! 60 वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीला एकटी पाहून घरी बोलावलं, त्यानंतर...

मुंबईत माणुसकीला काळीमा! 60 वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीला एकटी पाहून घरी बोलावलं, त्यानंतर...

मुंबईत माणुसकीला काळीमा!

मुंबईत माणुसकीला काळीमा!

Mumbai Crime News: माणुसकीला काळीमा फासणारी घटना मध्य मुंबईच्या वरळी परिसरातून समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 फेब्रुवारी : माणुसकीला लाजवेल अशी घटना देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून समोर आली आहे. येथे एका 60 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. विनयभंग करणाऱ्या 60 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी घरी एकटी असताना या आरोपींने तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मुलगी घरी एकटी दिसल्यानंतर आरोपीने मुलीला आपल्या घरी बोलावले. यानंतर आरोपीने तिला अश्लील व्हिडिओ दाखवला. तो इथेच थांबला नाही तर त्याने मुलीला अनुचित स्पर्शही केला. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, भास्कर तारी असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी, पॉस्को आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

वाचा - बुलढाणा : पेपर सुरू होण्याआधी बीकॉमच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल; वर्गखोलीत घेतला अखेरचा श्वास

घटनेची माहिती देताना वरळी पोलिसांनी सांगितले की, मुलगी शाळेतून घरी परतली तेव्हा आरोपीने तिला घरी बोलावले. यावेळी आरोपीही त्याच्या घरी एकटाच होता. आरोपीने तिला बोलावून अश्लील व्हिडिओ दाखवला. घटनेनंतर पीडितेने घरच्यांना याबाबत सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्याच आठवड्यात वरळीत आणखी एक लाजिरवाणी घटना घडल्याची माहिती आहे. गेल्या गुरुवारी एका 35 वर्षीय व्यक्तीने 20 महिन्यांच्या मुलीवर कथित बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. पोलिसांनी या प्रकरणी पोस्को कायदा आणि आयपीसी कलम 376 अन्वये गुन्हा दाखल केला होता. यासोबतच आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे.

First published:

Tags: Crime, Mumbai