मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Mumbai drug bust: क्रूझवरील 11 जणांपैकी तिघांना NCB ने दोन तासांत सोडलं?; Nawab Malik यांनी नावे आणि VIDEO केले जाहीर

Mumbai drug bust: क्रूझवरील 11 जणांपैकी तिघांना NCB ने दोन तासांत सोडलं?; Nawab Malik यांनी नावे आणि VIDEO केले जाहीर

Mumbai drug bust: क्रूझवरील 11 जणांपैकी तिघांना NCB ने दोन तासांत सोडलं?; Nawab Malik यांनी नावे आणि VIDEO केले जाहीर

Mumbai drug bust: क्रूझवरील 11 जणांपैकी तिघांना NCB ने दोन तासांत सोडलं?; Nawab Malik यांनी नावे आणि VIDEO केले जाहीर

Nawab Malik annouced names of people who release by ncb just 2 hours after raid on cruise: क्रूझवर धाड टाकण्यात आली त्यावेळी एकूण 11 जणांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यापैकी तिघांना सोडून देण्यात आलं असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 9 ऑक्टोबर : मुंबई जवळ Cordelia क्रूझवर एनसीबीने धाड टाकत ड्रग्ज पार्टीचा (NCB busted drug party on cruise) पर्दाफाश केला. ज्या दिवशी धाड टाकण्यात आली त्या दिवशी एकूण 11 जणांना ताब्यात घेतले होते मात्र, तिघांना अचानक सोडून देण्यात आलं असा दावा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. इतकेच नाही तर ज्या तिघांना सोडून देण्यात आले त्यांची नावेही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली आहेत. नवाब मलिक यांनी गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. या तिघांना सोडून देण्यात आले एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ज्या तिघांना सोडून देण्यात आले त्यामध्ये रिषभ सचदेवा, प्रतीक गाभा, आमिर फर्निचरवाला यांचा समावेश होता असं नावाब मलिक यांनी म्हटलं. क्रूझवर एनसीबीने 11 जणांना ताब्यात घेतले होते, ताब्यात घेतल्यावर चौकशीसाठी सर्वांना एनसीबी कार्यालयात आणलं आणि त्यानंतर तिघांना दोन तासांत सोडून देण्यात आले. तिघांना सोडून देण्याचा आदेश कुणी दिला? या तिघांचे फोन जप्त का नाही केले? असे सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केले आहेत. Mumbai Drug Case: BJP नेत्याचा तो मेहुणा कोण? , नवाब मलिकांनी केला मोठा खुलासा जबाबदार व्यक्ती असं कसं बोलू शकतो - नवाब मलिक ज्या दिवशी छापमारी केली त्या दिवशी समीर वानखेडे ने 8 ते 10 लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली. एक जबाबदार अधिकारी असं कसं म्हणू शकतो? असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. एनसीबीने खुलासा करावा रिषभ सचदेवा, हे भाजप युवा मोर्चाचे मोहित भारतीय यांचा मेहुणा आहे. रिषभ सचदेवा हे राष्ट्रपतींना पण भेटले आहेत, आणि राष्ट्रपती यांनी पुरस्कृत केलं आहे. रिषभ सचदेवा यांना 2 तासात सोडण्यात आलं. जेव्हा सुनावणी सुरू होती तेव्हा यांचं नाव समोर आलं होतं. यांच्याच बोलण्यावरून आर्यन आला होता, असा खुलासाही मलिकांनी केला आहे. या 3 लोकांना सोडण्याचे आदेश कुणी दिले हे एनसीबीला सांगावं लागेल, असा सवाल मलिकांनी एनसीबीला विचारलं आहे. आम्ही मागणी करयोय की वानखेडे यांनी याचा तात्काळ खुलासा करावा, असं मलिक म्हणाले. समीर वानखेडे यांचे फोन डिटेल्स काढावे रिषभ सचदेवा यांच्या बाबांच्या फोनवर महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील भाजप नेत्यांचा फोनवर वानखेडे यांचं बोलणं झालं, असा आमचा आरोप असल्याचं मलिकांनी म्हटलं आहे. ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली असून त्यात अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचाही समावेश आहे. या कारवाईची संपूर्ण देशभरात चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबी (NCB)वर गंभीर आरोप केला. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता नवाब मलिक शनिवारी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात नवी माहिती उघड करणार असल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी केला होता खळबळजनक खुलासा नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या कारवाईवर गंभीर आरोप केला. नवाब मलिक यांनी म्हटलं होतं, शनिवारी एनसीबी (NCB) ने CISF कडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर (Cruise Ship) छापा टाकला होता. या कारवाईत बॉलिवूडचा स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह काही जणांना अटक केली. एनसीबीनं केलेल्या या कारवाईसंदर्भात मलिक यांनी पत्रकार परिषदेत व्हिडीओ दाखवून गौप्यस्फोट केला आहे. 'आर्यन खानची अटक ही बनावट आहे. गेल्या एक महिन्यापासून याबद्दल पत्रकारांना माहिती प्रसारित केली जात होती की पुढील लक्ष्य अभिनेता शाहरुख खान आहे, असं नवाब मलिक म्हणाले. 'कारवाईच्या संदर्भातील जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊन जात आहे आणि याच व्यक्तीसोबत आर्यन खानचा एक सेल्फी फोटो आहे. त्यानंतर एनआयएनं दिल्लीतल्या एका अधिकाऱ्याच्या माहितीच्या आधारावर माहिती दिली की, NCB नं सांगितलं की हा व्यक्ती आमचा अधिकारी नाही. अरबाज मर्चंटचा देखील एक व्हिडीओ एनआयएनं रिलीज केला. यात लाल शर्ट घातलेली व्यक्ती दिसत आहे. हे दोन्ही फीड एनआयएनं रिलीज केलेत. या व्हिडीओत पहिला व्यक्ती के. पी. गोसावी आणि दुसरा व्यक्ती मनीष भानुशाली आहे, असंही मलिक यांनी सांगितलं. तसेच हा व्यक्ती भाजपचा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, जे. पी. नड्डा आणि आशिष शेलार यांच्यासोबत फोटो आहेत. त्यामुळे मलिकांनी काही सवाल उपस्थित केलेत. एनसीबी आणि भाजपचे काय संबंध आहेत हे एनसीबीनं सिद्ध करावं, असं आव्हानच मलिकांनी दिलं.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Drug case, Nawab malik, NCP

    पुढील बातम्या