Home /News /crime /

मुंबईत राहायला गेलेल्या प्रेमिकेसाठी वेडा झाला होता तरुण; प्रेमासाठी उचललं धक्कादायक पाऊल

मुंबईत राहायला गेलेल्या प्रेमिकेसाठी वेडा झाला होता तरुण; प्रेमासाठी उचललं धक्कादायक पाऊल

LoveSexaurDhokha: प्रेयसीच्या नवऱ्याला त्यांच्या प्रेमसंबंधाबद्द्ल कळल्यावर त्यांनी तिच्या नवऱ्यालाचं आपल्या मार्गातून दूर करायचं ठरवलं.

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी: आर.के. मला खूप भीती वाटत आहे, यापुढे तू मला फोन नको करत जाऊ, मनोजला समजलं तर खूप अवघड होईल. आरकेला मात्र हे सहन होत नव्हतं. आपल्या विवाहित प्रेयसीचा पती विरोध करत असल्यानं आपल्याला प्रेयसीला सोडून द्यावं लागणार हे मनोजला पटत नव्हतं. आरकेला आपलं प्रेम आणि प्रेमिका कोणतयाही परिस्थितीत मिळवायची होती. यासाठी त्यानं मनोजचा काटा काढण्याचं देखील ठरवलं होतं. जवळपास 3 वर्षांपूर्वी भावना व आरके म्हणजेच राधाकृष्ण याच्या कंपनीत काम करण्यासाठी आली होती. डिझेल बूस्टर यंत्र तयार करणाऱ्या या कंपनीत भावना ऑफिशिअल काम करत होती. भावना दिसायला सुंदर असल्यानं आरके आपोआप तिच्याकडं आकर्षित झाला. काम करत असताना अनेकदा तो चहा पिण्याच्या बहाण्यानं तिला आपल्या केबिनमध्ये बोलवत असे. सुरुवातीला काहीवेळा नाही म्हणणारी भावना हो  म्हणताच दोघेजण जवळच्या कॅफेमध्ये जाऊन कॉफीचा आनंद घेत असतं. सुरुवातीला केवळ चांगले मित्र असणाऱ्या दोघांच्या नात्यात प्रेमाला सुरुवात झाली. परंतु वैवाहिक असलेल्या भावनानं यामध्ये विरोध दर्शवला. सुरुवातीला पती मनोज याला या गोष्टी समजतील या भीतीनं भावनाने या गोष्टीला नकार दिला. परंतु आरकेचा रुबाब आणि पैसा पाहून भवनाच्या मनात देखील आकारसहन निर्माण झालं. यांनतर आरकें तिला आपल्या नात्यासाठी तयार केलं. आपल्या दोघांमध्ये होणाऱ्या भेटी गुप्त राहण्याचे वचन त्याने तिला दिलं. कुठंही याची वाच्यता होणार नसून दोघांमध्येच हे नातं राहणार असल्याचं त्यानं तिला पटवून दिलं. यानंतर दिल्लीमध्येच ऐका ठिकाणी या दोघांच्या गुप्त भेटी होऊ लागल्या. परंतु आहे गोष्टी फार काळ लपून राहत नाहीत. एक दिवस भावनाचा पती मनोज याच्या हाती तिचा मोबाईल लागला. यामध्ये या दोघांमधील संभाषण बघून त्याला या दोघांमधील नात्याचा संशय आला. यानंतर त्याने या दोघांविषयी जासूसी केली असता त्याला या दोघांच्या नात्याविषयी तपास लागला.  भवनाला याविषयी विचारल्यानंतर तिला आपला कृत्याबद्दल वाईट वाटलं. कौटुंबिक पार्श्वभूमी नई संस्कारांमुळं तिला याविषयी वाईट वाटलं. याविषयी मनोजने तिला विचारलं असता तो केवळ बॉस असल्यानं त्याच्याबरोबर बाहेर गेल्याच तिनं सांगितलं. आमचं दुसरं नातं नसल्याकक्सह तिनं मनोजला सांगितलं. मनोजने समज दिल्यानंतर देखील भावना त्याच्याबरोबर फिरत असल्याचं मनोजच्या निदर्शनास आलं. सार्वजनिक ठिकाणी एका घरी जात असताना त्यानं दोघानांही रंगेहाथ पकडलं. यावेळी त्याने भवनाच्या थोबाडीत मारत मनोज याला शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यावेळी नागरिकांची होणारी गर्दी पाहून आरकेने हे प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न केला. यामुळं मनोज भवनाला घेरून त्याच्या घरी आला. घरी आल्यानंतर त्यानं यावर निर्णय घेण्याचं नक्की केलं. तो मूळचा महाराष्ट्रातील असल्यानं त्यानं मुंबईमध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये मनोज भावनासह मुंबईमध्ये शिफ्ट झाला. परंतु आरकेच्या डोक्यातून भावना गेली नव्हती. त्यानं खूप प्रयत्न करून भावनाचा नंबर मिळवला आणि तिऊला फोन केला. आरकेचा फोन आल्यानं घाबरलेल्या भावनानं त्याला आपल्याला कोणताही नातं ठेवायचं नसल्याचं म्हटलं. परंतु आरकेने ठाम निर्णय घेतला होता. मनोने तिला धमकावून ठेवल्याचं त्याला वाटलं. त्याला कोणत्याही परिस्थितीत भवनाला मिळवायचं होत. याचबरोबर मनोजबरोबर झालेल्या वादाचा देखील बदला घ्यायचा होता. यासाठी त्याने मुंबईला जाऊन रेकी केली. याचवेळी दिल्लीमध्ये त्याची भेट राजेंद्र याच्याशी झाली. राजेंद्र आणि हेमेंद्र हे दोघे उत्तरप्रदेशचे रहिवासी होते. आपल्या योजेनमध्ये हे दोघे महत्त्वाचे ठरणार असल्याचे आरकेला वाटल्यानं त्याने या दोघांची मदत घेण्याचं ठरवलं. यासाठी त्याने एक प्लॅन तयार केला. यासाठी त्याने राजेंद्र आणि हेमेंद्रला मुंबईला जाऊन राजेंद्रचा तपास करण्यास सांगितलं. तो कात करतो याचा अभ्यास करण्यास सांगितलं. याचबरोबर भावनाचा काही पत्ता लागल्यास दुप्पट पैसे देण्याचं देखील वाचन त्यांना दिलं. यासाठी त्यानं दोघांचीही मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था केली. मुंबईमध्ये आल्यानंतर मनोज नालासोपारामध्ये राहत असल्याची माहिती दोघांना मिळाली. दादरमध्ये तो त्याच्या कामासाठी येत असल्याची माहिती दोघांना मिळाली. यामुळं त्याचा काटा काढू शकत असल्याची माहिती त्यांनी आरकेला दिली. त्यानंतर आरकेने 5 हजार रुपयांमध्ये पिस्तुलाची व्यवस्था केली. दोघांनी पुन्हा मुंबई गाठत 2 दिवस त्याच्यावर ठेवली. त्यानंतर दादरमध्ये तो एका ठिकाणी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. मागीलवर्षी 12 ऑकटोबरला तो दाराला आल्यानंतर दोघांनी त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. दादरला तो आल्यानंतर दोघांनी त्याला मारण्यासाठी त्याच्यावर बंदूक रोखली. वाचण्यासाठी त्यानं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला काही गोळ्या लागल्यापासून वाचल्यानंतयर अतिशय जवळून गोळ्या झाडल्यानं तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर हेमेंद्रने त्याच्यावर आणखी गोळ्या झाडत त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर दोघही रेल्वेमधून अमृतसरमार्गे दिल्लीमध्ये गेले. त्याठिकाणी आरकेने त्यांना ठरल्याप्रमाणे सुपारीचे प्रत्येकी 50 हजार रुपये दिले. आपलं हे कृत्य कुणीही पाहिलं नसल्याचं दोघानांही वाटलं. पण जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली होती. पोलिसांना या घटनेचा तपास करत असताना आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी दिल्लीला जात या तिघांनाही ताब्यात घेतलं. यावेळी चौकशीत 37 वर्षीय आरके म्हणजेच राधाकृष्ण कुशवाहा याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
Published by:news18 desk
First published:

Tags: Delhi, Mumbai, Murder, Women extramarital affair

पुढील बातम्या