लॉकडाऊनमध्ये मुंबईच्या बारमध्ये घडलं दुहेरी हत्याकांड, पाण्याच्या टाकीत आढळले दोन मृतदेह

लॉकडाऊनमध्ये मुंबईच्या बारमध्ये घडलं दुहेरी हत्याकांड, पाण्याच्या टाकीत आढळले दोन मृतदेह

मीरारोडमध्ये एका बारमधील दोन कर्मचाऱ्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Share this:

मुंबई, o5 जून : कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबईत दुहेरी हत्याकांडाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मीरारोडमध्ये एका बारमधील दोन कर्मचाऱ्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. लॉकडाऊनमध्ये मुंबईत घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरारोडच्या शीतल नगरमध्ये एमटीएनएल मार्गावर शबरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये हे दुहेरी हत्याकांड घडलं आहे. सदर बारच्या मालकाने याची माहिती गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मीरारोड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टाकीत दोघांचे मृतदेह आढळून आले. हे दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्यात आली आहे.

नरेश पंडित (52) व हरेश शेट्टी (48) अशी हत्या झालेल्यांची कर्मचाऱ्यांची नावं आहेत. दोघेही बारचे कर्मचारी होते. दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपअधीक्षक शांताराम वळवी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. दोन्ही मृतांच्या डोके व शरीरावर जखमा आढळल्या असून याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्या का व कोणी केली याचा पोलीस तपास करीत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर मृतांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस बार मालकाची आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करत असून परिसराती सीसीटीव्हीदेखील तपासण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

First published: June 5, 2020, 9:41 AM IST
Tags: murder

ताज्या बातम्या