मुंबई, 11 ऑक्टोबर : मुंबईतील चेंबूर परिसरात एका सोसायटीमध्ये दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका जणाला अटक करण्यात आली आहे तर दोन जण फरार झाले आहे.
मुंबईतील चेंबूर परिसरातील नित्यानंद सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. 10 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास अचानक दोन गटामध्ये सोसायटीच्या पार्किंगमध्ये मारामारी सुरू झाली. ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मुंबईतील चेंबूर परिसरात सोसायटीमध्ये दोन गटात हाणामारी pic.twitter.com/uN2SoHUcSy
— News18Lokmat (@News18lokmat) October 11, 2020
दोन गटामध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला होता. आधी दोघांमध्ये बाचाबाची झाली. पण काही वेळात बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी दोघांमध्ये मारामारी सुरू असताना कुटुंबातील सदस्यांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. पण, वाद इतका शिगेला पोहोचला होता की, दोन्ही गट एकमेकांना लाथा-बुक्याने मारहाण करत होते. या घटनेमुळे सोसायटीमध्ये एकच गोंधळ उडाला होता.
भरधाव बसची ट्रेनला धडक, 17 प्रवाशांचा जागीच मृत्यू 30 जखमी
सोसायटीत लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लोकांनी दोन्ही गटाला वाद मिटवण्याचा सल्ला दिला. पण, बऱ्याच वेळ या दोन्ही गटांमध्ये शिवीगाळ आणि मारामारी सुरूच होती.
या प्रकरणी चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका जणाला अटक केली आहे. तर इतर दोन जण फरार झालेले आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र, ही घटना नेमकी कुठल्या वादावरून झाली, याची माहिती मिळू शकली नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
कल्याणमध्ये पिस्तुल विकण्यासाठी आलेल्या दोघांना अटक
दरम्यान, कल्याणमधील गौरीपाडा परिसरात एक पिस्तुल आणि चार जिवंत काडतूस विकण्यासाठी आलेल्या दोन जणांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. सुशील भोंडवे आणि गौरव खर्डीकर अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. कोरोना लॉकडाउनमुळे मागील 6 महिन्यांपासून हाताला काम नसल्यामुळे ओढवलेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी या मजुरांनी गुन्हेगारीचा मार्ग अवलंबिला असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
'ही माफिया गँग मला मारून टाकेल आणि...',पायल घोषने थेट पंतप्रधानांकडे मागितली मदत
कमी श्रमात चांगले पैसे मिळतील, या आशेने या दोघांनी उत्तर प्रदेशमध्ये कमी किंमतीत हे पिस्तुल विकत घेतले होते. त्यानंतर कल्याणातील ग्राहकाला ते जादा किंमतीत विकत देण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, त्याआधीच ते पोलिसांच्या तावडीत सापडले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai