Home /News /crime /

पोलिसांच्या वर्दीतील तोतयाने केला Video Call, मुंबईतील तरुणाला 3 लाखांचा गंडा; अरेस्ट वॉरंटची घातली भीती

पोलिसांच्या वर्दीतील तोतयाने केला Video Call, मुंबईतील तरुणाला 3 लाखांचा गंडा; अरेस्ट वॉरंटची घातली भीती

व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करून पोलीस असल्याचे भासवत एका तरुणाची 3 लाख रुपयांची फसवणूक (Mumbai man duped of 3 lakh) केली गेली. मुंबईतील बोरिवली वेस्टला राहणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणाबाबत हा प्रकार घडला.

मुंबई, 21 एप्रिल: आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीची माहिती मागून ऑनलाइन फसवणूक झाल्याच्या कित्येक घटना पाहतो. मात्र, यावेळी वेगळ्या प्रकारे ऑनलाईन फसवणूक (Online fraud) केल्याची घटना मुंबईमधून समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करून पोलीस असल्याचे भासवत एका तरुणाची 3 लाख रुपयांची फसवणूक (Mumbai man duped of 3 lakh) केली गेली. मुंबईतील बोरिवली वेस्टला राहणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणाबाबत हा प्रकार घडला. तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो मागे घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे; असे सांगत तोतया पोलिसाने तरुणाकडून 3 लाख रुपये घेतले. ही रक्कम परत मिळेल असे त्याला सांगण्यात आले, मात्र दोन दिवसांनी रक्कमही मिळाली नाही, आणि पोलिसाचाही संपर्क बंद झाला. आधी महिलेने विश्वासात घेतलं या युवकाने दिलेल्या माहितीनुसार, 7 एप्रिल रोजी त्याला स्वाती पाटील नावाच्या एका महिलेचा फोन आला. आपण दिल्ली पासपोर्ट ऑफिसमधून (Fake call from passport office) बोलत असल्याचं तिनं सांगितले. तिने तरुणाच्या आधार कार्डवरील माहिती अगदी बरोबर सांगितली, त्यामुळे ती खरोखरच अधिकारी असावी याची खात्री तरुणाला पटली. यानंतर तिने पासपोर्ट नंबर कन्फर्म करण्यास सांगितले, मात्र आपल्याकडे पासपोर्ट नसल्याचे या तरुणाने स्पष्ट केले. त्यावर तिने या तरुणाला सांगितले, '30 मार्चला तुम्ही इथून थायलंडला गेला होता, आणि तिथे काही बेकायदेशीर काम केले. त्यामुळे पासपोर्ट ऑफिसला इमिग्रेशन ऑफिसकडून तुमच्याबद्दल तक्रार (Fake complaint in passport office) मिळाली आहे.' हे वाचा-स्वातंत्र्यानंतरही देशात दलित तरुणाला भयावह वागणूक; गावातील 11 जणांवर कडक कारवाई 'थायलंड काय मी तर मुंबई आणि गुजरात सोडून कुठेच गेलो नाहीये', असं या तरुणाने तिला सांगितलं. त्यावर तिनंदेखील तरुणावर विश्वास दाखवत, कोणीतरी त्याचे डॉक्युमेंट्स वापरून खोटा पासपोर्ट तयार केला असावा, असं म्हटलं. याबाबत दिल्ली क्राइम ब्रँचला पत्र लिहून तक्रार दाखल करण्याचा सल्लाही तिने या तरुणाला दिला. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. तोतया पोलिसाने केला व्हिडिओ कॉल यानंतर या तरुणाला सुनील कुमार नाईक असं नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला. आपण दिल्ली क्राइम ब्रँचमधून (Fake call from Delhi Crime branch) बोलत असल्याचे त्याने सांगितले. या तरुणाने घडलेला सगळा प्रकार नाईकला सांगितला. त्यानंतर नाईकने तरुणाला व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल केला. यावेळी नाईकने पोलीस युनिफॉर्म (Cyber fraud in police uniform on video call) घातला होता. त्यामुळे या तरुणाला नाईक खरंच पोलीस असल्याची खात्री पटली. नाईकने तरुणाला सांगितले, की त्याच्या विरोधात अरेस्ट वॉरंट (Cyber fraud by fake arrest warrant) जारी करण्यात आलं आहे. बनवली खोटी वेबसाईट आणि वॉरंट नाईकने या तरुणाला त्याच्यावर असलेले वॉरंट तपासण्यासाठी एका वेबसाईटची लिंक दिली. 'यावर तुमचा आधार क्रमांक टाकून तुमच्या विरोधात असलेले वॉरंट तपासा', असं नाईकने तरुणाला सांगितले. तरुणाने ती वेबसाईट उघडून पाहिल्यावर तिथे खरोखरच त्याच्याविरोधात वॉरंट असल्याचे दिसून आले. मनी लाँड्रिंग, ड्रग्ज आणि मानवी तस्करी अशा आरोपांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल (Fake arrest warrant) करण्यात आला होता. तसंच त्याला दिसताक्षणी अटक करुन, त्याची सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेश यात देण्यात आल होते. हे वाचा-बारामुल्लामध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, तीन परदेशी दहशतवाद्यांसह पाच ठार; चकमक अजून सुरुच तक्रारीसाठी ‘फी’ म्हणून मागितले पैसे आपण असे काहीही केले नसल्याचे या तरुणाने नाईकला सांगितले. नाईकनेही त्यावर विश्वास दाखवत, आपण याबाबत तक्रार दाखल करू असा विश्वास तरुणाला दिला. त्यासाठी नाईकने या तरुणाला एका बँक खात्यात फी म्हणून तीन लाख रुपये जमा करण्यास (Mumbai Man duped for 3 lakh) सांगितले. ही रक्कम 49 तासांमध्ये रिफंड होईल असंही त्याने सांगितले. या तरुणाने पैसे भरल्यानंतर नाईकने त्याला रितसर मनी क्लिअरन्स सर्टिफिकेटही पाठवलं. यामुळे या सर्व प्रकरणात तरुणाला आपण फसवले जात आहोत याचा आजिबात संशय आला नाही. दोन दिवसांनंतर जेव्हा या तरुणाचे पैसे परत आले नाहीत, तेव्हा त्याने नाईकला फोन केला. मात्र, त्याचा फोन कोणीच नाही उचलला. त्यानंतर त्याने स्वाती पाटील नाव सांगणाऱ्या महिलेच्या नंबरवर फोन केला, मात्र तोदेखील घेतला गेला नाही. यानंतर या तरुणाला आपली फसगत झाल्याचं लक्षात आलं. यानंतर तरुणाने पोलीस स्टेशनला धाव घेत एफआयआर दाखल केला.
First published:

Tags: Crime, Financial fraud

पुढील बातम्या