Home /News /crime /

'High Standard' चोरी! दुसऱ्या शहरात लुटमार करण्यासाठी ही महिला करायची विमानप्रवास

'High Standard' चोरी! दुसऱ्या शहरात लुटमार करण्यासाठी ही महिला करायची विमानप्रवास

एखाद्या महानगरात चोरी करण्यासाठी विमानानं सकाळी येणे आणि चोरी झाली की संध्याकाळचं विमान पकडून बंगळुरुमध्ये परत जाणे, ही तिच्या चोरीची पद्धत होती. तब्बल 10 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर तिला अटक करण्यात क्राईम ब्रँचला (Crime Branch) यश आलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 डिसेंबर :  महानगरातील मोठे मॉल आणि शो रुमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या हँडबॅग (Handbags) चोरणाऱ्या बंगळुरुच्या महिलेला मुंबई क्राईम ब्रँचनं (Mumbai Crime Branch) अटक केली आहे. मुनमुन हुसेन (Munmun Hussain) असं या 46 वर्षांच्या महिलेचं नाव आहे. ती एखाद्या महानगरात चोरी करण्यासाठी विमानानं सकाळी यायची आणि चोरी झाली की संध्याकाळचं विमान पकडून बंगळुरुमध्ये जायची, अशी पद्धत चोरी करण्यासाठी वापरत होती. तब्बल 10 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर तिला अटक करण्यात क्राईम ब्रँचला यश आलं आहे. ऑर्केस्ट्रामध्ये बार सिंगरचं काम करणाऱ्या मुनमुनवर मुंबईत झारा (Zara) आणि लॅक्मे (Lakme) यांच्या शो रुममधून ग्राहकांच्या हँडबॅग्ज चोरण्याचे तीन गुन्हे दाखल होते. त्याचबरोबर कोलकाता, हैदराबाद आणि बंगळुरुतही तिच्या नावावर वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद होती. ‘आपण 2009 सालापासून या प्रकारची चोरी करत होतो’, अशी कबुली मुनमुननं पोलिसांना दिली आहे. कसा शोध लागला? मुंबईतील लोअर परेलमध्येमधील एका मॉलमधील ‘झारा’ कंपनीच्या शो रुमधून मुनमुन ग्राहकाची बिल काऊंटरवरील बॅग घेऊन पसार झाली होती. या प्रकरणात संबंधित महिलेनं ना.म. जोशी पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार दाखल केली होती. “मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून तब्बल 14 लाख 90 हजारांची चोरी केल्याची तक्रार महिलेनं नोंदवली होती,’’ अशी माहिती पोलीस इन्सपेक्टर योगेश चव्हाण यांनी दिली. (हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये आजही तेजी,सोनखरेदीआधी तपासा नवे दर) या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मॉलमधील CCTV फुटेज तपासले, त्यावेळी त्यांना चोरी करत असलेल्या मुनमुनचा चेहरा फुटेजमध्ये सापडला. “आमचे सोर्सेस आणि तांत्रिक मदत यांच्या साह्यानं मुनमुनच्या बंगळुरुमधील घराचा पत्ता आम्हाला सापडला’’, असे चव्हाण यांनी सांगितले. चोरीसाठी विमानप्रवास मुनमुननं 2018 साली देखील शिवाजी पार्क आणि लोअर परेलमधील शो रुममधून चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. एखादी चोरी करण्यासाठी ती विमानानं दुसऱ्या शहरात दाखल होत असे, चोरी झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळच्या विमानानं बंगळुरुमध्ये परत जात असे, अशी तिच्या कामाची पद्धत होती. (हे वाचा-SBI अलर्ट! बँक ग्राहकांनी कुणाला 'ही' माहिती दिली असेल तर होईल लाखोंचं नुकसान) मुनमुन ही घटस्फोटीत महिला असून तिला एक मुलगी देखील आहे. तिच्या कमाईतून रोजच्या गरजा भागवणे शक्य होत नसल्यानं या प्रकारे ती चोरी करत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Mumbai

    पुढील बातम्या