मुंबई, 12 जुलै: राज्यात गुन्हेगार आणि गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यच्या अनेक भागांमध्ये मारामाऱ्या, हत्या, चोरी या बातम्या येत असताना आता मुंबईच्या धारावी भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने आपल्या पत्नीवर आणि काही नातेवाईकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, घरातील आर्थिक व्यवहाराच्या वादातून हा गुन्हा घडल्याचं सांगण्यात येत आहे. या इसमाने आपली पत्नी आणि काही नातेवाईकांवर बंदुकीने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपासून आर्थिक व्यवहारातून यांच्यात वाद सुरु होते आणि याचमुळे संतापाच्या भरात या इसमाने आपल्या पत्नीवर आणि नातेवाईकांवर गोळीबार केला आहे.
Shocking! जमिनीत जाणवली हालचाल; माती उकरताच दिसली 3 वर्षाची जिवंत मुलगी
सविस्तर बातमी अपडेट होत आहे....
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.