Google Pay वरून 2 रुपये भरले आणि पुढच्या क्षणी बसला 40000 चा फटका

क्रेडिट कार्डची व्हॅलिडिटी संपू नये म्हणून 2 रुपये भरा असा फोन आल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करताना केलेली एक चूक महागात पडली आणि मुंबईत अँटॉप हिल इथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाला एका क्षणात 40 हजार रुपयांचा फटका बसला.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2019 05:20 PM IST

Google Pay वरून 2 रुपये भरले आणि पुढच्या क्षणी बसला 40000 चा फटका

मुंबई, 4 नोव्हेंबर : ऑनलाईन पेमेंट करताना केलेली एक चूक महागात पडली आणि मुंबईत अँटॉप हिल इथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाला एका क्षणात 40हजार रुपयांचा फटका बसला. क्रेडिट कार्डची व्हॅलिडिटी संपत आल्याचं सांगणारा एक फोन या व्यावसायिकाला येत होता. Google Pay ने फक्त दोन रुपये भरा आणि क्रेडिट कार्डची वैधता न संपता वाढवली जाईल, असं त्यांना सांगण्यात आलं. त्यासाठी पाठवलेल्या एका लिंकद्वारे त्यांनी पैसे भरले आणि दुसऱ्या क्षणी खात्यातून 40000 रुपये काढले गेल्याचा मेसेज आला.

अँटॉप हिलला राहणाऱ्या अमिताभ राजवंश या 46 वर्षीय व्यापाऱ्याने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अमिताभ राजवंश यांना कस्टमर केअर नावाने एक फोन येत होता.

वाचा - स्टारचा मुलगा संन्यासी होण्याच्या मार्गावर, 28 व्या वर्षी गेला ओशोच्या आश्रमात

तुमच्या क्रेडिट कार्डची वैधता संपत आली आहे. क्रेडिट कार्डचा वापर सुरू ठेवायचा असेल तर 2 रुपये भरा, असं अमिताभ यांना सांगण्यात आलं. Google Pay द्वारे पैसे भरण्यासाठी अमिताभ यांच्या मोबाईलवर एक लिंकही देण्यात आली. या लिंकवर क्लिक करून त्यानी दोन रुपयाचे पेमेंट केले आणि पुढच्याच क्षणी 40000 रुपये काढल्याचा मेसेज त्यांना मोबाईलवर मिळाला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं अमिताभ राजवंश यांच्या लक्षात आलं.

अमिताभ राजवंश यांनी ज्या फोन नंबरवरून त्यांना फोन येत होते, त्यावर संपर्क साधायचा प्रयत्न केला. पण तो नंबर आउट ऑफ कव्हरेज एरिया अर्थात संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याचं सांगण्यात आलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून घेतला आहे. अँटॉप हिल पोलीस पुढचा तपास करत आहेत.

Loading...

--------------------------------------------------

अन्य बातम्या

शिवसेनेच्या भूमिकेवर अमित शाह नाराज, मुख्यमंत्रिपदावर तडजोड नाही

जेव्हा हा बॉलिवूड स्टार रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना फाइव्ह स्टारमध्ये घेऊन जातो

साता जन्माच्या गाठी अर्ध्यावरच सुटल्या, पत्नीच्या खूनानंतर पतीने...!

खळबळजनक घटना; महिला तहसीलदाराला कार्यालयातच पेट्रोल ओतून जिवंत जाळले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 05:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...