Home /News /crime /

Meerut News: मदरशात शिकवणाऱ्या मुफ्तीचे 11 वर्षाच्या मुलासह दुष्कर्म, 19 वेळा केला अत्याचार

Meerut News: मदरशात शिकवणाऱ्या मुफ्तीचे 11 वर्षाच्या मुलासह दुष्कर्म, 19 वेळा केला अत्याचार

उत्तरप्रदेश राज्यातील मेरठ (Meerut) जिल्ह्यातून एका संतापजनक बातमी समोर आली आहे. मदरशामध्ये शिकणाऱ्या एका 11 वर्षाच्या निष्पाप मुलासोबत तिथेच शिकवणाऱ्या मुफ्तीने तब्बल 19 वेळा दुष्कर्म केले आहे. (Mufti Misbehaved with boy) घटनेची माहिती समोर आल्यानंतर आरोपी मुफ्ती फरार झाला आहे.

पुढे वाचा ...
    मेरठ, 9 मे : उत्तरप्रदेश राज्यातील मेरठ (Meerut) जिल्ह्यातून एका संतापजनक बातमी समोर आली आहे. मदरशामध्ये शिकणाऱ्या एका 11 वर्षाच्या निष्पाप मुलासोबत तिथेच शिकवणाऱ्या मुफ्तीने तब्बल 19 वेळा दुष्कर्म केले आहे. (Mufti Misbehaved with boy) घटनेची माहिती समोर आल्यानंतर आरोपी मुफ्ती फरार झाला आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. अशी आली घटना समोर - मेरठमधील मवाना येथे दावतुल इस्लाम नावाचा मदरसा आहे. येथे ही घटना घडली. पीडित मुलगा हा सहारनपूर जिल्ह्यातील गंगोह ठाणे परिसरातील रहिवासी आहे. तो मागील दीड वर्षांपासून मेरठ येथील मवाना येथे मदरशात राहत होता. ईदच्या दिवशी पीडित मुलाने सहारनपूर येथे पोहोचून त्याच्या नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला. त्याने सांगितले की, मुफ्ती त्याला वेगळ्या खोलीत नेऊन अश्लिल कृत्य करायचा आणि अश्लिल शब्द बोलायचा. इतकेच नव्हे तर इतर मुलांसोबतही तो असेच कृत्य करत होता. यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी रविवार मवाना पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला. मदरशाच्या मुफ्तीने इतर अनेक मुलांसोबतही चुकीचे काम केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबासह इतरांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे या आरोपी मुफ्तीला अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हेही वाचा - संतापजनक! तरुणीच्या मृतदेहावर सामूहिक बलात्कार; असा झाला घटनेचा खुलासा पोलिसांनी मदरसा येथे चौकशी केली असता, तिथे 24 मुले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी इतर मुलांचेही जबाब नोंदवले आहेत. मुफ्तीने त्याच्या मालमत्तेच्या बळावर बेकायदेशीर मदरसा उघडला आहे, अशी माहितीही काही जणांनी पोलिसांना दिली. मदरशाच्या आधार घेऊन तिथे शिकणाऱ्या मुलांसोबत हा नराधम मुफ्ती अनेक वर्षांपासून दुष्कृत्य करत आहे. तर पोलीस अधीक्षक केशव कुमार यांनी सांगितले की, संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. आरोपीला अटक करण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Up crime news, Uttar pradesh news

    पुढील बातम्या