भोपाळ, 22 फेब्रुवारी : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) छतरपुरमध्ये 10 वीच्या विद्यार्थ्याने गणिताच्या भीतीने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने परीक्षेपूर्वी सोमवारी रात्री हे पाऊल उचललं. कुटुंबीय मंगळवारी सकाळी उठले तर मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. कुटुंबीयांनी सांगितलं की, परीक्षेचा तणाव असल्या कारणाने मुलाने आत्महत्या केली. शिव कॉलनीत राहणारा अमित ताम्रकार (17) उत्कृष्ठ विद्यालयाच्या 10 वीत शिकत होता. मंगळवारी त्याचा गणिताचा पेपर होता. परीक्षेमुळे सुमित तणावात होता. गणिताचा पेपर असल्या कारणाने तो अधिक तणावात होता. सुमितचे कुटुंबीय नंदकिशोन कुशवाहने सांगितलं की, मुलाने वर्षभर ऑनलाइन शिक्षण घेतलं होतं. मात्र परीक्षा ऑफलाइन होणार होती. सुमितची परीक्षेची तयारी नव्हती. यामुळे सुमित गेल्या अनेक दिवसांपासून तणावात होता. मंगळवारी गणिताचा पेपर होता. आम्ही त्याची समजून काढली होती. रात्री जेवल्यानंतर तो अभ्यास करायला निघून गेला होता. रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही जागे होतो. तोपर्यंत तो अभ्यास करीत होता. त्याने सकाळी साडे चार वाजता अलार्म लावला होता. अलार्म वाजल्यानंतरही तो उठला नाही. त्यानंतर मग आई उठली आणि खोलीत पाहिलं तर मुलगा गळफास लावलेल्या अवस्थेत होता. पोलिसांकडून तपास सुरू... पोलिसांनी सांगितलं की, मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. कुटुंबीयांनी सांगितलं की, अभ्यासामुळे तो तणावात होता. ऑनलाइन परीक्षा असती तर असं घडलं नसल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Board Exam, Online education, Suicide