मोतिहारी (बिहार), 13 एप्रिल : बिहारमधील पूर्व चंपारण (East Champaran) जिल्ह्यात गुन्हेगार निर्भय झाले आहेत. हो, कारण अशीच एक घटना समोर आली आहे. बुधवारी पहाटे एक शिक्षकावर भरदिवसा गुन्हेगारांनी गोळ्या झाडल्याची (firing on teacher) घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना हरसिद्धी पोलीस ठाण्याच्या उज्जैन लोहियार गावातील मगनुआ कालव्याच्या पुलाजवळ गोळीबाराची ही घटना घडली आहे. गायघाटचे रहिवासी शिक्षक आनंद भारती हे तुर्कौलिया पोलीस स्टेशनच्या जयसिंगपूर येथील उच्च माध्यमिक विद्यालयात सेवेत आहेत. ते सकाळी आपली पत्नी ज्या शिक्षिका आहेत त्यांना उज्जैन लोहियार माध्यमिक शाळेत सोडून परत येत होते.
पत्नीला सोडल्यानंतर घडली घटना
आनंद यांनी सांगितले की, महनुआ कालव्याच्या पुलाजवळ अपाचे मोटरसायकलस्वार आरोपींनी ओव्हरटेक केले. तसेच अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. यात शिक्षक आनंद भारती यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. यातील दोन गोळ्या त्यांच्या पोटात लागल्या आहेत. तर एक गोळी त्यांच्या मानेजवळ लागली आहे. दरम्यान, गोळीबारानंतर आरोपी फरार झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिकांनी जखमी शिक्षक आनंद भारतीला मोतिहारी जवळच्या एका रुग्णालात दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
हेही वाचा - Dhananjay Munde Health update: मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांनी दिली महत्त्वाची अपडेट
कोणाशीही वैर नसताना घडली घटना -
जखमी शिक्षक आनंद भारती यांनी सांगितले की, नेहमीप्रमाणे ते आजपण आपल्या पत्नीला उज्जैन लोहियार गावातील माध्यमिक शाळेत सोडून परतत होते. याच दरम्यान, ही घटना घडली. अपाचे दुचाकीवरील तीन आरोपींनी ओव्हरटेक केल्यानंतर आनंद यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. ते म्हणाले की, माझे कुणासोबतच कोणत्याच प्रकारचे वैर नाही. तर रुग्णालयात पोहोचलेल्या आनंद भारतीच्या भावाने सांगितले की, कुटुंबातील कोणाशीही वैर नाही. घटनेची माहिती मिळताच हरसिद्धी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Crime news, Gun firing, Teacher