मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ज्याला डॅडी म्हणायची त्यानेच दाखवला क्रूर चेहरा; दोन वर्षांच्या लहानगीचा आईच्या प्रियकरानेच केला निर्घृण खून

ज्याला डॅडी म्हणायची त्यानेच दाखवला क्रूर चेहरा; दोन वर्षांच्या लहानगीचा आईच्या प्रियकरानेच केला निर्घृण खून

रागाच्या भरात आपल्या पार्टनरच्या दोन वर्षांच्या गोंडस, लाघवी मुलीला पाशवीपणे मारहाण करून तिचा खून करणाऱ्या युवकाला गजाआड करण्यात आलं आहे.

रागाच्या भरात आपल्या पार्टनरच्या दोन वर्षांच्या गोंडस, लाघवी मुलीला पाशवीपणे मारहाण करून तिचा खून करणाऱ्या युवकाला गजाआड करण्यात आलं आहे.

रागाच्या भरात आपल्या पार्टनरच्या दोन वर्षांच्या गोंडस, लाघवी मुलीला पाशवीपणे मारहाण करून तिचा खून करणाऱ्या युवकाला गजाआड करण्यात आलं आहे.

क्लीव्हलँड (ब्रिटन), 30 नोव्हेंबर : रागाच्या भरात आपल्या पार्टनरच्या दोन वर्षांच्या गोंडस, लाघवी मुलीला पाशवीपणे मारहाण करून तिचा खून करणाऱ्या ब्रिटनमधल्या 27 वर्षांच्या युवकाला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अॅडम जॅक्सन (Adam Jackson) असं त्या हैवानाचं नाव असून, टीसाइड क्राउन कोर्टाने (Teeside Crown Court) त्याला 29 नोव्हेंबर रोजी साडेसोळा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. आपण हे कृत्य केल्याचं अॅडम जॅक्सनने कबूल केलं आहे. 'दी सन डॉट को डॉट यूके'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

ग्रेस थोर्पे (Gracve Thorpe) असं त्या दोन वर्षांच्या दुर्दैवी मुलीचं नाव असून, अॅलिस क्वाइन (Alice Quine) असं तिच्या आईचं नाव आहे. ही घटना घडण्याच्या वर्षभर आधीपासून अॅडम आणि अॅलिस रिलेशनशिपमध्ये होते. ग्रेस अॅडमला डॅडी असं म्हणायची. अॅडमला कोकेन आणि अन्य अमली पदार्थांचं व्यसन होतं. त्यासाठी पुरेसे पैसे मिळाले नाहीत, तर त्याचा तोल सुटून तो प्रचंड हिंसक व्हायचा. या कारणावरून अॅलिस आणि अॅडम यांच्यात पूर्वी ब्रेकअपही झाला होता; मात्र वर्षभरापूर्वी ते दोघं पुन्हा एकत्र आले होते.

मांडव बनला आखाडा, डीजेवरून पाहुण्यांमध्ये तुफान हाणामारी; पाहा राड्याचा VIDEO

क्लीव्हलँडमधल्या (Cleveland) न्यू मार्स्के (New Marske) येथे अॅलिस आपली मुलगी आणि अॅडमसह राहत होती. घटनेच्या दिवशी ग्रेसला अॅलिसकडे सोपवून अॅलिस कामावर गेली होती. तेवढ्यात अचानक अॅडम हिंसक झाला आणि त्याने लहानग्या ग्रेसला तब्बल सात वेळा मारलं. त्यात तिच्या डोक्यावरही आघात केले. लाथाही मारल्या. त्यामुळे तिचा जबडा, पाय फ्रॅक्चर झाला.

VIDEO: चिडलेल्या बापाची मुलाला अमानुष मारहाण, तक्रारीनंतर पोहोचला तुरुंगात

चेहरा खरचटला, मेंदूत रक्तस्राव झाला आणि अखेर प्रचंड वेदना सहन करून दोन दिवसांनी तिचा मृत्यू झाला. ती जखमी झाल्यानंतर बऱ्याच वेळानंतर त्याने डॉक्टर्सना बोलावलं. संशयास्पद कृत्याची पोलिसांना खबर पोहोचताच त्यांनी तपास सुरू केला. सुरुवातीला अॅडमने कोर्टात असा दावा केला होता, की ती तिच्या खुर्चीतून पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला; मात्र पोलिस तपास आणि वैद्यकीय तपासणी आदींच्या साह्याने हे सिद्ध झालं, की अॅडमने निर्दयपणे मारहाण केल्यामुळेच तिचा मृत्यू झाला. अखेर त्याने स्वतःही ते कबूल केलं.

सीलिंगमधून गोळी गेली आरपार; खालच्या मजल्यावर झोपलेल्या भारतीय मुलीचा गेला जीव

दोन वर्षांची ग्रेस कोकेनसारख्या अंमली पदार्थांच्या नियमित संपर्कात येत होती, असंही वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झालं.

ग्रेसच्या मृत्यूमुळे आपण सर्वस्व गमावल्याची वेदना तिची आई अॅलिस हिने व्यक्त केली. आपण अॅडमवर विश्वास ठेवला; त्याने मात्र त्याचा प्रत्येक वेळी आणि शक्य तेवढा गैरफायदा घेतला, असंही तिने सांगितलं. 'मी माझ्या विश्वासह त्याच्यावर विश्वास ठेवला होता आणि त्याने अवघ्या काही सेकंदांत ते सारं माझ्यापासून हिरावून नेलं. त्याला कितीही मोठी शिक्षा झाली असली, तरी मला आणि माझ्या कुटुंबाला आयुष्यभरासाठी जे काही भोगावं लागणार आहे, त्याच्याशी त्या शिक्षेची तुलना होऊ शकत नाही,' असंही अॅलिस म्हणाली.

First published:

Tags: Britain