मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मुलाच्या आत्महत्येचं दुःख सहन न झाल्याने आईनेही उचललं भयानक पाऊल, पालघरमधील धक्कादायक घटना

मुलाच्या आत्महत्येचं दुःख सहन न झाल्याने आईनेही उचललं भयानक पाऊल, पालघरमधील धक्कादायक घटना

पालघरमधील सफाळे येथील कांद्रेभुरे येथे ही घटना घडली.

पालघरमधील सफाळे येथील कांद्रेभुरे येथे ही घटना घडली.

पालघरमधील सफाळे येथील कांद्रेभुरे येथे ही घटना घडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Palghar, India
  • Published by:  News18 Desk

पालघर, 2 सप्टेंबर : राज्यात गुन्हेगारी तसेच आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील विविध भागातून आत्महत्येच्या उघडकीस येत आहेत. आता पालघर जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने केलेल्या आत्महत्येचं दुःख सहन न झाल्याने एका महिलेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

मुलाने केलेल्या आत्महत्येचे दुःख सहन न झाल्याने आईनेही विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये घडला आहे. पालघरमधील सफाळे येथील कांद्रेभुरे येथे ही घटना घडली. येथील शैलेश पाटील या 26 वर्षीय तरुणाने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी कळताच शैलेशची आई कल्पना पाटील हिने देखील गावातील विहीरीत उडी मारून आत्महत्या केली.

मृत शैलेश याची व्हॉट्सअॅपला एका मुलीसोबत मैत्री झाली होती. तसेच तो सेक्सटोर्शनचा बळी ठरल्याचा अंदाज शैलेशच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आता मुलाच्या आत्महत्येचं दु:ख सहन न झाल्याने या महिलेनेही आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर आत्महत्या केलेला मुलगा शैलेश याच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा - दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालाची भिती, शिक्षकाच्या मुलाने घेतला टोकाचा निर्णय

दरम्यान, कल्पना यांच्या पतीने आणि त्यांच्या मुलीने पोलिस किंवा हॉस्पिटलला न कळवता दोघांचेही अंत्यसंस्कार केले. त्यामुळे कुटुंबातील या दोन्ही सदस्यांनी आत्महत्या का केली आणि अंतिम संस्कारापूर्वी कुटुंबीयांनी पोलिसांना याची माहिती का दिली नाही, याचा तपास सुरू केला आहे, अशी माहितीही केळवा पोलिसांनी दिली.

First published:

Tags: Palghar, Woman