• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • आई इतकी निष्ठूर कशी झाली; वारंवार दूध मागतो म्हणून चिडून मुलाला उचलून आपटलं, जागीच मृत्यू

आई इतकी निष्ठूर कशी झाली; वारंवार दूध मागतो म्हणून चिडून मुलाला उचलून आपटलं, जागीच मृत्यू

या क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात प्रमिलानं केलेल्या कृत्यामुळे निरागस मुलाला प्राणाला मुकावे लागले, आई इतकी निष्ठूर कशी झाली, अशी चर्चा परिसरात आहे.

 • Share this:
  कोरबा, 23 सप्टेंबर : आई आणि बाळाच्या नात्याला गालबोट लावणारी धक्कादायक घटना घडली आहे. एक निरागस बाळ वारंवार आईकडे दूध पिण्याचा आग्रह करत होते. यामुळे संतप्त झालेल्या क्रूर आईनं मुलाला पकडून जमिनीवर जोरात आपटले, ज्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू (Child death on the spot) झाला. स्वतःच्या मुलाच्या हत्येप्रकरणी (crime news) पोलिसांनी आईला अटक केली आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. मृत मुलाचे वय फक्त 3 वर्षे होते. ही घटना छत्तीसगडच्या कोरबा येथील बालकानगर परिसरातील आहे. प्रमिला असे या क्रूर मातेचे नाव असून या तीन वर्षांच्या मुलाचे सात्विक राव असे नाव होते. सात्विक हा आई प्रमिलाकडून वारंवार दूध पिण्याचा आग्रह करत होता. या क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात प्रमिलानं केलेल्या कृत्यामुळे निरागस मुलाला प्राणाला मुकावे लागले, आई इतकी निष्ठूर कशी झाली, अशी चर्चा परिसरात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी आई प्रमिला काही वेळ मुलाला खाऊ घालत राहिली, समजावत राहिली. तरीही मूल रडत होते, मग रागाच्या भरात प्रमिलाने सात्विकला उचलून जमिनीवर आपटलं. घटनेनंतर कुटुंबातील इतरांनी पाहिले की, सात्विक जमिनीवर पडलेला आहे. त्यानंतर कुटुंबातील काहींनी त्याला रुग्णालयात नेले. तिथे पोहचताच डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. हे वाचा - एका शब्दावरुन पेटला वाद; नागपुरात तरुणाने चाकूने भोकसून जीवलग मित्राला संपवलं प्रमिलाने मुलाला फेकून दिले तेव्हा तिचा पती घरी नव्हता. त्या काळात घरी फक्त प्रमिलाचे सासरे उपस्थित होते. या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की 2014 पासून प्रमिलाची मानसिक स्थिती चांगली नाही. या कारणास्तव, प्रमिलाचे कुटुंबीय तिच्यावर उपचार करत आहेत. तरीही तिची प्रकृती आजपर्यंत सुधारलेली नाही. हे वाचा - केक कापताना मेणबत्ती विझवत होती प्रसिद्ध अभिनेत्री; अचानक केसांनी घेतला पेट अन्…, पाहा Shocking Video कानाला गंभीर दुखापत कोरबा पोलिसांनी असेही सांगितले की, जमिनीवर आदळल्यामुळे सात्विकच्या कानात खूप जखम झाली होती, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलीस प्रमिलाला अटक करत असून पुढील तपास सुरू आहे. आईच्या मानसिक स्थितीबाबत आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली जात आहे. आरोपीची डॉक्टरांकडून तपासणी करण्याची पोलिसांची तयारी आहे.
  Published by:News18 Desk
  First published: