मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /3 मुलांच्या आईचं धक्कादायक कृत्य; 20 वर्षीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा केला भयानक शेवट, 32 दिवसांनी खुलासा

3 मुलांच्या आईचं धक्कादायक कृत्य; 20 वर्षीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा केला भयानक शेवट, 32 दिवसांनी खुलासा

बुद्धपुरा गावात राहणाऱ्या रामहेतची पत्नी रीना हिचे शेजारी राहणाऱ्या 20 वर्षांच्या सूरजसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या 6 महिन्यांपासून दोघांमधील जवळीक इतकी वाढली होती की, त्यांनी एकमेकांसोबत जगण्याची आणि मरण्याची शपथ घ्यायला सुरुवात केली.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Madhya Pradesh, India

भोपाळ 01 मार्च : मध्य प्रदेशातील मुरैना येथे एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून मृतदेह घराच्या मागे असलेल्या मोहरीच्या शेतात पुरला. मात्र या प्रकरणाचा सखोल तपास करताना पोलिसांना 32 दिवसांनी शेतात पुरलेला मृतदेह सापडला. याप्रकरणी मृताच्या पत्नीसह तिच्या प्रियकरालाही अटक करण्यात आली आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुद्धपुरा गावात राहणाऱ्या रामहेतची पत्नी रीना हिचे शेजारी राहणाऱ्या 20 वर्षांच्या सूरजसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या 6 महिन्यांपासून दोघांमधील जवळीक इतकी वाढली होती की, त्यांनी एकमेकांसोबत जगण्याची आणि मरण्याची शपथ घ्यायला सुरुवात केली. पण रीनाचा नवरा रामहेत जिवंत असताना हे शक्य झालं नाही. त्यामुळे रीनाने आपल्या पतीला मार्गातून काढण्याचा बेत आखला.

म्हणे त्याच्याशीच लग्न करेन, घरच्यांनी समजावले, ऐकलं नाही तर बापानं विषयच संपवला!

पोलिसांनी सांगितलं की, 26 जानेवारीच्या रात्री रामहेत दारूच्या नशेत झोपला होता. त्यामुळे संधी साधून रीनाने प्रियकर सूरजला गच्चीवरून बोलावलं आणि दोघांनी रामहेतचा गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह घराच्या पाठीमागे असलेल्या मोहरीच्या शेतात टाकून शेताच्या मध्यभागी खड्डा बनवला आणि मृतदेह पुरला.

रामहेत दोन-तीन दिवसांपासून कामानिमित्त बाहेर गेल्याचं रीनाने सासरच्या मंडळींना सांगितलं. रामहेतचा भाऊ आणि वडिलांनी त्याच्या मोबाईलवर फोन केला असता रीनाचा प्रियकर सूरजने फोन उचलला. सूरजने फोन उचलताच रामहेतच्या नातेवाईकांना संशय आला आणि त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तो हरवल्याची तक्रार नोंदवली.

कंपनीवर हवे होते पूर्ण नियंत्रण, सांताक्रूझ पतीच्या हत्येप्रकरणी आरोपपत्रात धक्कादायक खुलासा

पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता रीना आणि सूरजचे प्रेमसंबंध समोर आले. पोलिसांनी सुरजची कोठडीत कडक चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण समोर आलं. त्यानंतर पोलीस सूरज आणि रीनासह घटनास्थळी पोहोचले आणि मोहरीच्या शेतात पुरलेला मृतदेह बाहेर काढला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सूरज आणि रीनाला अटक केली. पोलिसांनी सांगितलं की, रीनाला तीन मुलं आहेत आणि तिचा प्रियकर फक्त 20 वर्षांचा आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Murder news