मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पोटच्या मुलाला त्याच्या वाढदिवशीच संपवले! 'या' धक्कादायक कारणामुळे आईच्या नात्याला फासला काळीमा

पोटच्या मुलाला त्याच्या वाढदिवशीच संपवले! 'या' धक्कादायक कारणामुळे आईच्या नात्याला फासला काळीमा

मध्यप्रदेशच्या शाजापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांमुळे (Immoral Relation) एका आईने आपल्या प्रियकराच्या मदतीने तिच्याच मुलाचा खून (Mother Killed Son) केला आहे. या मुलाने त्याची आई आणि तिचा प्रियकर या दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

शाजापूर, 6 मे : मध्यप्रदेशच्या शाजापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांमुळे (Immoral Relation) एका आईने आपल्या प्रियकराच्या मदतीने तिच्याच मुलाचा खून (Mother Killed Son) केला आहे. या मुलाने त्याची आई आणि तिचा प्रियकर या दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. यानंतर त्यांचे गुपित उघड होईल आणि आपली बदनामी होईल, या भीतीने मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याचा खून करण्यात आला. ही घटना शाजापूर जिल्ह्यातील अकोदिया येथे घडली. 3 मेला 12 वर्षाच्या मुलाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चौकशीला सुरुवात केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

काय आहे नेमकी घटना - 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 मेला दुपारी जवळपास अडीच वाजेच्या सुमारास वरुण अचानक घरी पोहोचला. त्यावेळी त्याची आई ममता आणि तिचा प्रियकर संजय बामनिया त्याचवेळी घरी आहे, असे वरुणला माहित नव्हते. जसा तो घरात घुसला त्याच वेळी त्याने आपली आई ममता आणि तिचा प्रियकर संजय बामनिया या दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. मुलाला पाहून दोघांनाही धक्का बसला. यानंतर आई ममताने विचार केला की जर मुलाला जिवंत सोडले तर संपूर्ण गुपित उघड होईल आणि त्याची बदनामी होईल. यानंतर तिने प्रियकर संजयशी बोलून वरुणचे तोंड उशीने दाबले. थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा - मुस्लीम तरुणीशी प्रेमविवाह, भररस्त्यात लोकांच्या देखत तरुणाचा भयंकर शेवट

पोलिसांना आईवर गेला संशय - 

मुलाचा खून केल्यानंतर ममता जिथे शेतात चालली गेली आणि तिचा प्रियकर उज्जैन येथील त्याच्या घरी गेला. तर वरुणचा मृतदेह तिथेच घरात पडून राहिला. संध्याकाळी वरुणची बहीण घरी पोहोचली तेव्हा तिला धक्काच बसला. तिने लगेचच शेजाऱ्यांना याबाबत सांगितले. तसेच शेजाऱ्यांनी त्याच्या वडिलांना आणि पोलिसांना बोलावून घेतले. तर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चौकशीला सुरुवात केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. अकोदिया पोलीस ठाण्याचे प्रमुख लक्ष्मण सिंह देवडा यांनी सांगितले की, या खून प्रकरणात पोलिसांचा संशय मृताची आई ममतावर गेला. पोलिसांनी तिची कसून चौकशी केल्यानतंर या खूनाबाबत खुलासा झाला आह. याप्रकरणी मृत मुलाची आई ममता आणि तिचा प्रियकर संजय याला अटक करण्यात आली आहे.

First published:

Tags: Madhya pradesh, Murder Mystery, Murder news