मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पतीचा राग पोटच्या मुलींवर काढला; 3 लेंकींना विष देऊन आईने घेतला क्रूर बदला

पतीचा राग पोटच्या मुलींवर काढला; 3 लेंकींना विष देऊन आईने घेतला क्रूर बदला

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सुहवाल पोलीस स्टेशन हद्दीतील ढढ़नी भानमल राय गावात एका महिलेचे तिच्या पतीसोबत काही कारणावरून भांडण झाले होते.

गाजीपूर, 16 ऑगस्ट : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यातच आता उत्तर प्रदेश राज्यातील गाजीपूर येथून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आई ही जन्मदात्री असते, पालनपोषण करणारी असते. मात्र, या घटनेनंतर खरंच कोणती महिला इतकी निर्दयी आणि कठोर असू शकते का? असा प्रश्न तुम्हाला पडेल.

काय आहे संपूर्ण घटना -

एका महिलेचे पतीसोबत भांडण झाल्यावर तिने आपल्या तीन मुलींना विष पाजून हत्या केली. ही धक्कादायक घटना गाजीपूरच्या सुहवाल पोलीस स्टेशन परिसरातील आहे, जिथे एका आईनेच आपल्या तीन मुलींना विष देऊन संपवले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुहवाल पोलीस स्टेशन हद्दीतील ढढ़नी भानमल राय गावात एका महिलेचे तिच्या पतीसोबत काही कारणावरून भांडण झाले होते. यानंतर महिलेने कोणताच विचार न करता रागाच्या भरात तिच्या तीन मुलींना विष पाजले मारुन टाकले. तसेच विष प्यायल्यानंतर तिन्ही मुलांची प्रकृती अचानक बिघडू लागली आणि विष दिल्यानंतर दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. तर एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा - रस्त्यावर, टपरीवर चहा पित असाल तर सावधान! होऊ शकतो हा गंभीर आजार

आरोपी महिलेला अटक -

या प्रकरणी महिलेने तिच्या तीन मुलींची हत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी महिलेला अटक केली आहे. पोलीस महिलेची चौकशी करत असून चौकशीनंतरच या तिहेरी हत्याकांडामागील कारण काय आहे, हे समोर येईल.

First published:

Tags: Daughter, Murder news, Up crime news, Wife and husband