• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • पतीचा राग मुलांवर काढला; महिलेनं पोटच्या 5 लेकरांची केली निर्घृण हत्या

पतीचा राग मुलांवर काढला; महिलेनं पोटच्या 5 लेकरांची केली निर्घृण हत्या

दुसऱ्या महिलेसोबत आपल्या पतीचा फोटो पाहिल्यानंतर 28 वर्षीय क्रिस्टियन (Christiane K) भडकली. तिनं रागात आपल्या पाच मुलांची हत्या केली. क्रिस्टियन हिला सहा मुलं होती.

 • Share this:
  नवी दिल्ली 05 नोव्हेंबर : एका महिलेनं आपल्याच पाच मुलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे (Mother Killed Her 5 Kids). आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध (Extramarital Affair of Husband) असल्याने ती नाराज होती. मुलांना मारण्याआधी तिनं पतीला मेसेज केला, की तो आता आपल्या मुलांना कधीच पाहू शकणार नाही. ही घटना जर्मनीमधील असून कोर्टाने महिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 17वर्षीय मुलीवर 17 जणांकडून गँगरेप; अनेक दिवस घरात डांबून सुरू होता भयावह प्रकार 'मिरर यूके'च्या वृत्तानुसार, दुसऱ्या महिलेसोबत आपल्या पतीचा फोटो पाहिल्यानंतर 28 वर्षीय क्रिस्टियन (Christiane K) भडकली. 3 सप्टेंबर 2020 रोजी तिनं रागात जर्मनीच्या सोलिंगन (Germany, Solingen) येथे आपल्या पाच मुलांची हत्या केली. क्रिस्टियन हिला सहा मुलं होती. कोर्टात सांगितलं गेलं, की सर्व मुलांचं वय अकरा वर्षापेक्षा कमी होतं. पाच मुलांचा बाथटबमध्ये बुडून किंवा गुदमरून मृत्यू झाला. याआधी या मुलांना विषारी पदार्थ खाऊ घातला गेला होता. यानंतर तिनं सर्व मृतदेह टॉवेलमध्ये बांधले आणि बेडवर ठेवले. तिचा सर्वात मोठा मुलगा वाचला, जो त्यावेळी अकरा वर्षाचा होता. कारण घटनेच्या वेळी तो घरी नव्हता. दोन दिवसात NCB ची दुसरी धडक कारवाई, चार कोटींच्या हेरॉईनसह एक जण अटकेत मुलांना मारल्यानंतर क्रिस्टियन हिनं आत्महत्येसाठी डसेलडोर्फ सेंट्रल स्टेशनवर ट्रेनसमोर उडी घेतली, मात्र यातून ती वाचली. तपास करणाऱ्या टीमनं असा दावा केला, की क्रिस्टियन हिनं आपल्या पतीचा दुसऱ्या महिलेसोबतचा फोटो पाहिला होता. पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा तिला संशय होता. यामुळे तिनं ही हत्या करण्याआधी आपल्या पतीला मेसेज केला होता, की तू कधीच आपल्या मुलांना पाहू शकणार नाही. कोर्टानं काही दिवसांपूर्वीच क्रिस्टियन हिला याप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
  Published by:Kiran Pharate
  First published: