चुरू, 1 एप्रिल : आपलाच लहान मुलगा आणि मुलीला कुंडामध्ये फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार आईने केला आहे. मुलांना कुंडामध्ये फेकून आईदेखील उडी मारणार होती, पण ती पाणी बघून घाबरली. पोलिसांनी कुंडामधून दोन्ही लहान मुलांचे मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमला पाठवले, यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आले. मुलांच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आईविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईच्या या कृत्यामुळे परिसरामध्ये खळबळ माजली आहे. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातल्या सरदारशहर भागात हा प्रकार घडला आहे.
शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास 2 मुलं कुंडामध्ये बुडून मेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर लगचेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मुलांना बाहेर काढण्यात आलं, पण तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. पोलिसांनी मुलांचे मृतदेह स्थानिक रुग्णालयात नेले. शनिवारी मुलांच्या वडिलांनी पत्नीविरुद्ध तक्रार दाखल केली.
शुक्रवारी आपण शेतामध्ये पशूंना चारा देत होतो, तेव्हा पत्नी ममता, 3 वर्षांची मुलगी हिमानी आणि 7 वर्षांचा मुलगा मयंक घरी होते. घराजवळ असलेल्या कुंडावर उभं राहून पत्नीने मला आवाज दिला, त्यानंतर मी पळत आलो, तेव्हा तिने दोन्ही मुलांना कुंडात टाकल्याचं सांगितलं, असं मृत मुलांचे वडील रामसीसर भेडवालिया यांनी सांगितलं.
मी कुंडामध्ये वाकून बघितलं तेव्हा हिमानी आणि मयंक यांचे मृतदेह तरंगत होते. यानंतर आपण शेजारी आणि नातेवाईकांना बोलावलं आणि पोलिसांनाही घटनेची माहिती दिली, असं रामसीसर भेडवालिया म्हणाले. पोलिसांना अजूनही आईने दोन्ही मुलांना कुंडात का ढकललं? याचं कारण समजू शकलेलं नाही. पण प्राथमिक तपासानुसार मुलांना कुंडात फेकल्यानंतर आईदेखील उडी मारणार होती, पण पाणी बघून ती घाबरली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.