सासूचा कांड! एका मुलासोबत लावलं लग्न; तीन दीरांसोबतही शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं

सासूचा कांड! एका मुलासोबत लावलं लग्न; तीन दीरांसोबतही शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं

नवऱ्यासहीत सासू आणि तीन दीरांनी मिळून 19 वर्षीय नव विवाहीत (bride) महिलेसोबत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पीडित महिलेला सासूने (Mother in law) आपल्या चारही मुलांसोबत (Four sons) अवैध शारीरिक संबंध (Immoral realation) ठेवण्यास भाग पाडलं आहे.

  • Share this:

लखनऊ, 11 जानेवारी : नवऱ्यासह सासू आणि तीन दीरांनी मिळून 19 वर्षीय नव विवाहीत महिलेसोबत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पीडित महिलेला सासूने आपल्या चारही मुलांसोबत अवैध शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं आहे. सलग दोन महिने या अत्याचाराला सामोरं गेल्यानंतर ती आपल्या माहेरी आली आहे. त्यानंतर तिनं घडलेल्या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून, सिहानी गेट पोलीस स्टेशनमध्ये महिलेचा पती आणि सासूसह 6 लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुराव्यांच्या अधारे या घटनेचा तपास सुरू आहे.

सदर घटना उत्तरप्रदेशातील गाझीयाबाद येथील आहे. येथील पीडित महिलेला लग्नानंतर सासूने आपल्या चारही मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं आहे. शिवाय तिचं लग्नही फसवणूकीतून लावून दिलं आहे. लग्नाची बोलणी लहान भावासोबत केली आणि ऐनवेळी लग्न मात्र मोठ्या भावासोबत लावून दिलं दिलं आहे. त्यानंतर प्रकरण एवढ्यावरचं थांबलं नाही, तर सासूने नात्याच्या सर्व परिसीमा गाठत आपल्या चारही मुलांसोबत अवैध संबंध ठेवण्यास भाग पाडलं आहे. अवैध संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर तिला दीर आणि सासूने मारहाण देखील केली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

19 वर्षीय पीडित महिला उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील सिहानी गेट परिसरात राहते. तिचं दोन महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. पीडितेची आई एका सोसायटीमध्ये काम करते. तिथेच गार्डची नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून पीडितेच्या आईने तिच्या लग्नाची बोलणी मुरादनगरमधील एका मुलाशी केली. पण लग्नाच्या दिवशी आक्रीतच घडलं. जेव्हा ती लग्न मंडपात पोहोचली तेव्हा नवरदेव म्हणून दुसरीच व्यक्ती बसली होती. नंतर समजलं की ज्याच्यासोबत लग्नाची बोलणी झाली होती, त्याचा हा मोठा भाऊ होता. पीडित महिलेच्या कुटुंबियांसोबत असा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर समाजात मान खाली घालायला लागू नये, म्हणून आईच्या सांगण्यावरून ऐनवेळी त्या मुलीनं त्या मुलासोबत लग्न केलं.

हे ही वाचा-पॉर्न व्हिडीओ पाहून शारीरिक संबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू की हत्या? प्रेयसीला अटक

लग्नाच्या पहिल्याच रात्री पीडितेचा नवरा नशेचं इंजेक्शन घेऊन झोपी गेला होता. लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून या महिलेवर अत्याचार सुरू झाले. पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटल्यानुसार, तिच्या पतीला 2 मोठे भाऊ आणि एक लहान भाऊ आहे. दोन्ही मोठ्या भावांचं लग्न यापूर्वीच झालं आहे. तिच्या सासूने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या नवीन सूनेसोबत शारिरीक संबंध ठेवण्यासाठी मोठ्या मुलांना आणि लहान दीराला आळीपाळीनं पाठवलं. मात्र तिने याला विरोध केला आणि रूममधून बाहेर आली.

Published by: News18 Desk
First published: January 11, 2021, 4:03 PM IST

ताज्या बातम्या